Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

साप चावला तरी पहिले दहावीची परिक्षा देणारी मुलगी !!

साप चावला तरी पहिले दहावीची परिक्षा देणारी मुलगी !!

Loading...
ऐन परीक्षेच्या दिवसी घरीच साप चावला...घरी सांगितले तर परीक्षा बुडेल...म्हणून काहीच न सांगता , न घाबरता कबन सांगवी या गावी परीक्षा केंद्रावर जाऊन ती वर्गात बसली ...सापाचे विष अंगात भिनल्याने चक्कर येऊन ती कोसळली...तिला साप चावलाय हे कळताच शिक्षकांची पाचावर धारण बसली...धावपळ करून तिला जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले...तिथून लातूरच्या सरकारी दवाखान्यात ...उपचारादरम्यान तिने डॉक्टरांना सांगितले " डॉक्टर, मला जाऊद्या...मला परीक्षा द्यायची आहे...! "
Loading...
डॉक्टरांचे मन हेलावले...दरम्यान ही गोष्ट शिक्षणाधिकाऱ्यांच्या कानावर गेली...ते स्वतः दवाखान्यात आले...त्यांनाही तिने विनंती केली...शिक्षणावरची तिची निष्ठा पाहून अधिकार्‍यांनी तिथेच परीक्षा देण्याची व्यवस्था केली...एका हाताला सलाईन सुरू असताना दुसर्‍या हाताने तिने तीन तास पेपर लिहिला...तोही इंग्रजीचा...!
दहावीच्या परीक्षेत 74 टक्के गुण मिळवून आता तिने औरंगाबाद येथील स. भू. महाविद्यालयात अकरावी विज्ञान वर्गात प्रवेश घेतलाय..!
ही यशोगाथा आहे शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डिघोळ गावच्या प्रतीक्षा सुरेश कांबळे या बहाद्दर मुलीची...! उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर यांच्या सोबत प्रतीक्षाच्या घरी जाऊन सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा ,महात्मा फुले यांचा ग्रंथ आणि एक छानसे रोपटे देऊन तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या...! प्रतीक्षाच्या जिद्दीला सलामच...!!