Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

गेम ऑफ थ्रोन्सचे भारताशी असलेले संबंध

गेम ऑफ थ्रोन्सचे भारताशी असलेले संबंध

Loading...
   गेम ऑफ   थ्रोन्स   जगभरात सर्वात जास्त पाहिली जाणारी व लोकप्रिय मालिका म्हणजेच 'गेम ऑफ थ्रोन्स'. जो सीझनचा चाहता आहे त्याने 'गेम ऑफ थ्रोन्स' पाहिली नसेल तर नवलंच. या मालिकेचा नुकताच अखेरचा व सातवा सीझन प्रकाशित झाला आहे. या मालिकेचा पहिला भाग अमेरिकेमध्ये 'HBO' या वाहिनीवर 17 एप्रिल 2011 रोजी प्रदर्शित करण्यात आला तर नुकताच अखेरचा सीझन संपला. ही लोकप्रिय मालिका जरी हॉलिवूडची असली तरी या मालिकेत भारतीयांचं सुद्धा योगदान आहे. नेमकं काय आहे भारतीयांचं योगदान त्याविषयी जाणून घेऊयात...

डेनेरिसचे ड्रॅगन्स आहेत मुंबईचे-  डेनेरिसचे ड्रोगॉन, रहेगार आणि विसेरिऑन हे तीन ड्रॅगन्स मुंबईमध्ये बनवले गेले आहेत. लॉस एंजेलिसमधल्या प्राना स्टुडिओज या कंपनीच्या मुंबई ऑफिसमध्ये हे तीनही ड्रॅगन्स बनवण्यात आले आहेत. पाचव्या सीझनमधले काही सेट्स आणि महाकाय गर्दीची दृश्यंही मुंबईच्या याच ऑफिसमध्ये बनवली आहेत.

इंदिरा वर्मा-  इलेरिया सँडचं काम करणारी अभिनेत्री भारतीय वंशाची आहे. युके मध्ये जन्मलेल्या इंदिराचे वडील भारतीय आहेत. तिचा पहिला सिनेमा 'कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह' यामुळंच ती सर्वांना माहिती झाली होती.


स्टाझ नायर-  खोनो या एका डोथराकी योद्धाचं काम करणारा अभिनेतासुद्धा भारतीय वंशाचा आहे. त्याचे वडील भारतीय तर आई रशियन आहे.


दिल्लीची कंपनी पुरवते कॉच्युम-  कपडे, फर्निचर, तयार वेण्या, चिलखतं, तंबू, कशिदाकारी, सेट्स आणि इतर लागणारे सुटे भाग हा  सगळा माल दिल्लीची रंग्रासन्स नावाची कंपनी पुरवते. या कंपनीचं आणि गेम ऑफ थ्रोन्सच 2011 पासूनचं कनेक्शन आहे. यापूर्वी गांधी, कॅप्टन अमेरिका, ग्लॅडिएटर आणि प्रिन्स ऑफ पर्शियासारख्या इतर सिनेमांसाठीही त्यांनी कॉच्युम पुरवला आहे.


डेहराडूनची प्रॉपर्टी-  जॉन स्नोची लाँगक्लॉ, नेड स्टार्कची आईस, जोफ्रीची विडोज वेल, ब्रियन ऑफ टार्थ आणि जेमीची ओथकीपर या सगळ्या तलवारी डेहराडून आणि मीरतमध्ये बनवल्या गेल्या आहेत. या मालिकेत वापरलेले वलेरियन स्टील डॅगर, हँड ऑफ क्वीनचा ब्रोच हे सगळं विंडलास अँड सन्स आणि लॉर्ड ऑफ बॅटल्स या कंपन्यांनी बनवले आहेत.