Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

भिकारी समजून रजनीकांत ला दिले १० रुपये आणि पुढे रजनीकांतने जे केले ते बघून थक्क व्हाल !

रजनीकांत ला भिकारी समजून दिले १० रुपये

हा माणूस एवढा मोठा सुपरस्टार का आहे ?? द नेम इज रजनीकांत
माझी खरी ओळख ही सुपस्टार नाही..तर सामान्य माणसासारखीच आहे

Loading...
काही दिवसांपूर्वी रजनीकांत चेन्नईतील एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर मंदिराजवळच विश्रांती घेण्यासाठी ते बसले होते. त्यादरम्यान, एक महिला तेथून जात असताना तिने रजनीकांत यांना भिकारी समजून 10 रुपयांची नोट दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजनीकांत यांनी एकही शब्द न बोलता हसतमुखाने ती नोट स्विकारली.
नोट घेतल्यानंतर रजनीकांत आपल्या गाडीकडे गेले असता, महिलेला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिच्या लक्षात आले की, ही व्यक्ती कोणी भिकारी नसून सुपरस्टार रजनीकांत आहेत. महिलेने थेट गाडीकडे धाव घेत रजनीकांत यांची माफी मागितली.

रजनीकांत यांनी दिलेले उत्तर ऐकल्यावर हा माणूस एवढा मोठा सुपरस्टार का आहे हे कळते. "जे काही झाले चांगलेच झाले. कारण, देव मला आपल्याकडून वेळोवेळी हेच सांगत आहे की, आपले पाय नेहमीच जमिनीवर असले पाहिजेत. माझी खरी ओळख ही सुपस्टार नाही, तर सामान्य माणसासारखीच आहे", असे उत्तर देऊन रजनीकांत निघून गेले. ही माहिती खुद्द त्या महिलेने दिली असून तिचे नाव डॉ. गायत्री आहे. तिने लिहिलेल्या द नेम इज रजनीकांत या पुस्तकात या संदर्भाचा उल्लेख केला आहे