Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

राज ठाकरे ह्यांच्या अधिकृत फेसबुक पेजची झाली सुरुवात !

Raj Thackeray
Raj Thackeray


इतके दिवस का लावले ? असे म्हणत आज अखेर घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ह्यांनी आपल्या फेसबुक पेजची स्थापना केली.
राज साहेब ह्यांना खरे तर  वर्तमान पत्र सुरू करायचे होते पण त्याची आर्थिक गणिते ही आता आवाक्याबाहेर गेली असल्याने त्यांनी तो विषय सध्या बाजूला ठेवल्याचे नमूद केले आणि म्हणूनच सोशल मीडियाचा आधार आपण फेसबुकवर स्वताःह येत आहोत तसेच फेसबुकचे महत्व देखील आपल्याला ठाऊक आहे असे राजसाहेबांनी यावेळी नमूद केले.
ह्या फेसबुक पेज द्वारे नियमित लोकांशी ते स्वतः संवाद सादतील तसेच त्यांना जे अनेक राजकीय,अराजकीय विषय मांडायचे आहे ते देखील ह्या माध्यमातून ते जनते समोर आणतील.
Loading...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जे काही चांगले काम करत आहेत ते ह्या माध्यमातून लोकांपर्यंत आणण्याचा विश्वास ह्या वेळी त्यांनी व्यक्त केला ...
 भविष्यात हे फेसबुक पेज लोकांपर्यन्त काय काय पोहोचवते हे बघणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल ...

>>> राज ठाकरे ह्यांचे फेसबुक पेज <<<