Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

भाकीत : २०१९ मध्ये होणार सत्तांतर अशी असेल पुढची परिस्थिती !२०१९ च्या लोकसभा निवडणुकी नंतर असणारे चित्र ...
काँग्रेस मुख्यालयाबाहेर फटाके फुटत आहे ... ममता,लालू,मुलायम,ओवेसी हे सर्व नेते देशाचा हुकूमशहा पडला म्हणून हाताचे व्ही दाखवून मीडिया समोर एकत्र येत आहे .. मायावती सोबत येणार का ? पुढचा पंतप्रधान कोण असेल ? ह्या सर्व प्रश्नांना ममता आणि लालू मोठ्या अविर्भावात उत्तर देत आहे ! दक्षिण भारतात देखील केरळ मध्ये मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट लोकांनी रस्त्यावर येउन जल्लोष करणे सुरु केले आहे ... स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे काश्मिरी आपला आनंद व्यक्त करत 'आज हमारे लिये ईद का मौका हे' अश्या आनंदात पाकिस्तानचे झेंडे हाती घेऊन नाचत,गात आहे ... तिकडे रोहिंग्या मुस्लिमांच्या ४-५ लाख जमावाने भारताच्या पूर्व सीमेवर गर्दी करायला सुरुवात केली आहे कि आता लवकरच आपल्याला भारतात प्रवेश मिळणार ह्याची ते खात्री व्यक्त करत आहे ... 'मी बोललो नव्हतो?' असे म्हणत राज ठाकरे ह्यांनी एका खासदारासह आणि आप च्या ५ खासदारांनी नवीन सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे !

Loading...
अखेर सर्व पक्षीय बैठक संपन्न होऊन राहुल गांधी, ममता बॅनर्जी ह्यांना अडीच-अडीच वर्ष पंतप्रधान पद मिळेल असा निर्णय बाहेर पडला आहे ... भारतचे पंतप्रधान राहुल गांधी, गृहमंत्री ममता बॅनर्जी आणि संरक्षण मंत्री मुलायम सिंग ह्यांनी पहिल्याच दिवशी खालील प्रमुख निर्णय जाहीर केले आहे त्यात काश्मीर मधून सेना हटवणार, ३ तलाखच्या मुद्द्याला स्थगिती देणार, भारतीय सैन्याला मोदी सरकारने दिलेल्या बॉडी आर्मर मध्ये काही घोटाळा तर नाही ना हे बघणार, बुलेट ट्रेनचा मार्ग बदलणार, सध्याच्या शिक्षण खात्याशी निगडित प्रोजेकटला स्थगिती मिळणार, आयात केलेल्या युरियाला जे निम मिश्रित केले जाते ती प्रक्रिया रद्द करणार, कृषी क्षेत्रात परत आमूलाग्र बदल घडवणार, स्वच्छ भारत अभियानाचा पुनर्विचार करणार, केंद्रीय खात्यात सर्व फाईल्सचे ट्रेकिंग ठेवले जाते ज्यावर उगाच वायफळ खर्च होतो ती पद्धत रद्द करणार, पर्यावरण विभागाचे ना हरकत दाखले परत एकदा केंद्रातून मिळवावे लागतील, संरक्षण खात्यात खरेदी केलेल्या करोडोच्या शस्त्र, आण्विक बोटी ह्यांचे करार रद्द करणार, राम मंदिराचे काम थांबवून परत प्रश्न कोर्टासमोर नेणार, रेल्वेच्या irctc वेबसाईटचा स्पीड वाढवतांना केलेला घोटाळा तपासणार मोदी सरकारने घेतले असे अनेक निर्णय तपासून आम्ही देशाला न्याय मिळवून देऊ असे ममता बॅनर्जी ह्यांनी स्पष्ट केले ....
मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्वच्छ भारत हे सर्व फसलेले प्रयोग आहे असे देशाचे उद्योग मंत्री आणि आपचे जेष्ठ नेते अरविंद केजरीवाल ह्यांनी आज स्पष्ट केले आम्ही त्यात सर्व बदल करून आमच्या पद्धतीने नवीन आणि देशाला पूरक असे मार्गक्रम करू
साल २०२१: आता माहित नाही पंतप्रधान कुठल्या देशात जातात आणि कोणाशी भेटतात, आता आम्हाला काही माहित नाही कुठं काय चालू आहे मीडिया पण शांतच आहे तसा , कोणत्या देशातून इन्व्हेस्टमेंट आली ते पण माहित नाही, नवीन धरण झाले काय, विमानतळ बांधले काय कोणाला त्याचे काही नाही, कोणाला आता आरक्षण पण नको सर्वत्र सामाजिक न्याय प्रस्थापित झाला आहे , ना वाहतूक आणि रस्ते मंत्रालयाच्या कामाची कोणाला काही दखल आहे ना, ऊर्जा मंत्राच्या ना कोणत्या इतर नेत्याच्या! आता शेतकरी पण आत्महत्या करायचे बंद झाला आहे, देशात सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे .. कपिल सिब्बल,पी चिदंबरम,अभिषेक मनू सिंघवी ह्यांनी परत एकदा देशाला विकासाच्या विमानात स्वार केले आहे ... तेजस्वी यादव ह्यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मोठी आव्हाहने पेलण्यास सक्षम आहे ... सोनिया गांधी ह्यांची प्रकृतीपण सुधारत आहे ...
नरेंद्र मोदी ह्यांच्यावर ईडीची चौकशी लावण्यात आली आहे आणि लवकरच त्यांना स्पेशल न्यायालयात पोहोचावे लागेल अशी चिन्ह आहे ... देशासाठी १८-१८ तास का काम केले ? सैन्य आधुणिकीकरण का केले ? सर्व खेड्यात वीज का पोहोचवली ? रोज २० किमी चे राष्ट्रीय महामार्ग का बांधले आधीचे दिवसाला २ किमी रोज मध्ये काय प्रश्न होता ? एवढी सौर ऊर्जा का निर्माण केली ? रेल्वे मध्ये फ्रांस सोबत १०० बिलियन डॉलरचा करार का केला ? देशाला पुढे नेण्याची जिद्द का ठेवली ? एयर इंडियाला नफा झालाच कसा ? नवरात्री मध्ये उपवास धरून हिंदुत्व का लादले ? जीएसटी सारखी कर प्रणाली आणण्याची धमक का दाखवली अश्या १० हजारहून जास्त प्रश्नांना मोदींना प्रश्न देयचे आहे ... मोदींनी कसून चौकशी करा असे शिवसेनेने देखील आवाहन माननीय न्यायालयास केले आहे ...
पुढचे ५० वर्ष आम्ही हटणार नाही असा विश्वास रॉबर्ट वाड्रा ह्यांनी व्यक्त केला आहे आणि जनतेचे आभार मानले आहे !
धन्यवाद !!!

[ सदरहू लेख हा कल्पनाविलास आहे ... आशा आहे कोणाला राग येणार नाही .. ]