Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

दगडूशेठ गणपती मंडळाचा कळस उतरवतांना अपघात ! - बघा व्हिडिओ

पुण्यातील सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणार्‍या दगडूशेठ गणपती मंडळाचा कळस उतरवतांना अपघात घडून एक व्यक्ति कळसावरुण खाली पडल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे .... 
देवकृपेने सदरहू व्यक्ति सुरक्षित असून असून दगडूशेठ गणपती ट्रस्टने खालील निवेदन प्रसिद्ध केले आहे !

Loading...
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा देखावा असलेल्या ब्रह्मणस्पती मंदिरावरील कळस उतरविताना क्रेन सर्व्हिसेस मधील राम जाधव (वय २९) यांना शनिवारी (दि.२) मध्यरात्री अपघात झाला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीकरीता दगडूशेठ गणपतीची मुख्य देखाव्याशेजारील दोन्ही रस्त्यावरील सजावट उतरविताना हा अपघात झाला. कळसावरील घुमट क्रेनच्या सहाय्याने उतरविताना जाधव यांचा तोल गेल्याने ते अपघाताने खाली पडले होते.

हे पण नक्की वाचा >>> गेम ऑफ थ्रोन्सचे भारताशी असलेले संबंधगणपती बाप्पाच्या कृपेने त्यांना मोठी इजा झालेली नाही. जाधव यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तसेच हाताला काही प्रमाणात खरचटले असून हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन डॉ. आनंद काटकर हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. जाधव यांच्या गुडघ्यावर पुढील दोन दिवसात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आठ दिवसात घरी सोडणार असल्याचे डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे