Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

नवीन मोबाइलला घेण्यासाठी बापाने चक्क स्वतःच्याच मुलाला विकले !!!!


ही घटना आहे ओडिसामधील भद्रक गावातील. मुखी नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या मुलाला २५ हजाराला विकून टाकले ते पण मोबाईल घेण्यासाठी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीने २५ हजाराला त्याचा मुलाला विकले आणि त्या २५ हजारातील  २ हजार रुपये मोबाईलसाठी खर्च केले, त्याच्या ७ वर्षाच्या मुलीसाठी दीड हजाराचे चांदीचे पैंजण खरेदी केले आणि बायकोसाठी साडी घेतली व बाकीचे सर्व पैसे दारूवर उडवले.

Loading...
नवीन मोबाइलला घेण्यासाठी बापाने चक्क स्वतःच्याच मुलाला विकले!!!!- For Buy A New Cellphone Father Sold His Own Son
पोलिसांनी सांगितले कि, मुखीचे मासिक उत्पन्न काही नव्हते तो सफाई कामगार होता. मुखींचा साडू बालिया आणि अंगणवाडीचे  अधिकारी या गुन्ह्यात सामील होते. फक्त पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी हा गुन्हा केला होता. पोलिसांना त्या मुलाला वाचवण्यात यश आला आहे आणि आता पोलीस त्या विकत घेणाऱ्या कुटुंबाची चौकशी करत आहे.