Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

निर्मला सीतारामन; पहिल्या 'स्वतंत्र' महिला संरक्षण मंत्री

निर्मला सीतारामन; पहिल्या 'स्वतंत्र' महिला संरक्षण मंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवून नवा इतिहास रचला आहे. सीतारामन यांच्यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी 1975 साली 20 दिवस  व 1980 ते 82 अशी दोन वर्षे या पदावर होत्या. मात्र, फक्त संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान सीतारामन यांनी मिळवला आहे.  त्या २०१० ते २०१४ भारतीय जनता पक्षाच्या सदस्य होत्या.

निर्मला सीतारामन कोण आहेत?

Loading...

तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीत मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मला यांचा 18 ऑगस्ट 1959 रोजी जन्म झाला. तामिळनाडूमध्ये बी.ए पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जेएनयू अर्थात जवाहरलाल नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि एक हुशार विद्यार्थिनी असा लौकिक त्यांनी मिळवला. परराष्ट्र संबंधात पी. एचडी पदवीही त्यांनी मिळवली आहे. आंध्र प्रदेशातील राजकीय नेते परकला प्रभाकर यांच्याशी 1986 साली निर्मला विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर काही काळ त्या लंडनला स्थायिक झाल्या. पण तिथं फारकाळ रमल्या नाही आणि पुन्हा मायदेशात परत आल्या. 


राजकीय प्रवास

2003 ते 2005 दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगासाठी काम करताना त्या सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आल्या. आणि येथून त्यांचा भाजपमधील व राजकीय प्रवास सुरु झाला. निर्मला सीतारमण यांची आंध्रप्रदेशातून राज्यसभेवर नियुक्तीही झाली होती. सध्या त्या कर्नाटकातून राज्यसभा सदस्य आहेत.