Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

दाऊदला मोठा झटका, ही संपत्ती झाली जप्त !

दाऊदला मोठा झटका; संपत्ती जप्त!- dauds Get Shoked His All Property Has Sealed


मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका ब्रिटन सरकारने दिला आहे. त्याची जवळपास ६ बिलियन डॉलरची संपत्ती म्हणजे भारतीय चलनानुसार तब्बल ४.५ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ही अटक भारत सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मानण्यात येत आहे.

Loading...

  किती आहे लंडनमध्ये दाऊदची संपत्ती ?


  • लंडनच्या हर्बर्ट रोडवर दाऊदने 35 कोटी रुपयांची संपत्ती खरेदी केली होती.
  • स्पिटल स्ट्रीटवर दाऊदचं 45 खोल्यांचं आलिशान हॉटेल आहे.
  • रोहॅम्पटनमध्ये दाऊद इब्राहिमची कमर्शिअल बिल्डिंग आहे.
  • लंडनच्याच जॉन्सवूड रोडवर दाऊदचं मोठं घर आहे.
  • याशिवाय शेफडर्स बुश, रोमफोर्ड क्रोयदोमध्ये हॉटेल आणि संपत्ती आहे.

        खोट्या नावाने घेतली दाऊदने संपत्ती


यात अब्दुल शेख इस्माईल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख मोहम्मद इस्माईल, अनीस इब्राहिम, शेख मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज इब्राहिम, दाऊद फारूकी, अनीस इब्राहिम, हसन शेख, दौद हसन, शेख इब्राहिम कासकर, दाऊद हसन, इब्राहिम मेमन, साबरी दाऊद, साहब हाजी आणि सेठ बड़ा सामील आहे. 

     दाऊदचे होते तीन रहिवासी पत्ते


ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या 'Financial Section Targets in the UK' या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील ३ ठिकाणांच्या पत्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. ते खालीलप्रमाणे आहेत...

१) हाऊस नं. 37, गली नंबर 30, डिफेन्स हौसिंग अथॉरिटी, कराची, पाकिस्तान.

२) नूराबाद, कराची, पाकिस्तान.

३) व्हाईट हाउस, सौदी मस्जिदजवळ क्लिफ्टन, कराची.

  जगातील दुसरा सर्वाधिक श्रीमंत गँगस्टर


फोर्ब्स मॅगझिननुसार मोस्ट वॉन्टेड गँगस्टरपैकी एक असलेल्या दाऊद इब्राहिमची एकूण संपत्ती जवळ पास ६ अब्ज डॉलर आहे. दाऊद हा जगभरातील दुसरा सर्वाधिक श्रीमंत गँगस्टर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई आणि लंडन यात्रेदरम्यान दाऊदची संपती जप्त करायच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. दाऊद इब्राहिमाला ग्लोबल टेरेरिस्ट घोषित करण्या बरोबरच जगभरात पसरलेले बरेच बिझनेस आणि प्रॉपर्टीला जप्त करण्याचे काम करण्यात येत आहे. भारत सरकारने बर्‍याच देशांमध्ये दाऊदच्या संपत्तीबद्दल पुख्ता माहिती दिली आहे. ज्यानंतर दाऊदला नेस्तनाबूद करण्यासाठी संबंधित सरकार कारवाई करत आहे.