Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

३३ कोटी देव हि व्याख्या समजून घ्या

खंडोबा जेजूरी
खंडोबा जेजूरी

हिंदु धर्माची ३३ कोटी देव ही संकल्पना-
कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे . खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, “प्रकार”.
कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात “बैजिक पदांच्या कोटी” हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो.
आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे –

Loading...
१)धाता २) मित्र ३)अर्यमा ४) शक्र ५)वरुण ६)अंश ७) भग ८)विवस्वान ९) पूषा १०) सविता ११)त्वष्टा आणि १२)विष्णू
हे 12आदित्य.
(संदर्भ: महाभारत, आदि. 65/15-16)
१३)धर १४)ध्रुव १५)सोम १६)अह: १७) अनिल १८) अनल १९) प्रत्यूष आणि २०) प्रभास हे 8 वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. 66/18)
२१)हर २२) बहुरूप २३) त्रयम्बक २४) अपराजित २५) वृषाकपि  २६)शंभू  २७)कपर्दी २८) रैवत २९)मृगव्याध ३०)शर्व आणि ३२)कपाली हे ११ रुद्र.
(संदर्भ: हरिवंश, 1/3/51-52)
आणि
आणखी दोन २ अश्विनीकुमार!
वरील सर्व ३३ प्रकारचे देव आहेत.तेव्हा,उगाच भुल थापांना बळी पडु नका.