Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

माणसे फोडून,नगरसेवक फोडून, आमदार फोडून सत्ता येत नाही - अशोक चव्हाण .. नांदेड मध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमत

 

पत्रकार परिषदे मध्ये अशोक चव्हाण बोलले कि 'जेव्हा पासून नांदेड महापालिका स्थापन झाली तेव्हा पासून ती काँग्रेसच्या ताब्यात होती, जनतेने नोटा बंदी नंतर भाजपाला दिलेले हे उत्तर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे भाजप ने अक्षम्य दुर्लक्ष केले. घोषित ७३ जागांपैकी ६७ काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहे तसेच उरलेल्या सर्व जागा काँग्रेसच जिंकेल'
काँग्रेस पक्षाच्या कठीण काळामध्ये नांदेड वासियांनी पक्षावर,माझ्यावर आणि पक्ष प्रमुख सोनिया गांधी ह्यांच्यावर जो विश्वास दाखवला हे नांदेड वासियांचे उपकार आहेत आणि हा विजय त्यांचाच आहे, भाजप ची खोटी आश्वासने आणि मंत्र्यांचा आलेला जथ्था ह्याला नांदेड वासीय बळी पडले ह्याचा आनंद असल्याचेहि अशोक चव्हाण म्हणाले.
माणसे फोडून,नगरसेवक फोडून, आमदार फोडून सत्ता येत नाही, भाजप ने अनेक लोक फोडले पण त्याचा परिणाम विपरीतच झाला. आणि लवकरच देशभरात काँग्रेसची सत्ता येईल.
फक्त महापालिकाच नाही तर जिल्हा परिषदे मधून पण काँग्रेसचेच बहुमत आले आहे ... राहुल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास ठेवला आहे .. कर्जमाफी,पेट्रोल दरवाढ, अविकास ह्या कारणांनी भाजप सत्तेतून जाईल ह्या सोबत त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत .. बघूया भविष्य काय ठरवते ते !!