Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

वडापाव विकून केली एल्फिन्स्टन अपघातातील पीडित परीवालाला ८३ हजाराची मदत

वडापाव विकून केली एल्फिन्स्टन अपघातातील पीडित परीवालाला ८३ हजाराची मदत  
 २९ सप्टेंबर ला एल्फिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या मयुरेश हळदणकर ह्या वरळीतील तरुणाच्या कुटुंबाला तेथील वडापाव विक्रेते मंगेश अहिवळे यांनी मदतीचा हात दिला आहे.
१४ ऑक्टोम्बरला त्यांनी वडापाव विक्री करून ८३ हजार ९११ रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत मयुरेशच्या परिवाराला दिली आहे.

वडापाव विकून केली एल्फिन्स्टन अपघातातील पीडित परीवालाला ८३ हजाराची मदत
मयुरेश हळदणकरच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन अनोखा आदर्श मंगेश अहिवळे ह्यांनी मुंबईकरांपुढे ठेवला आहे. अहिवळे ह्यांच्या त्याच स्टेशन परिसरामध्ये वडापाव विक्रीचा स्टॉल आहे.

वडापाव विकून केली एल्फिन्स्टन अपघातातील पीडित परीवालाला ८३ हजाराची मदत

त्यांनी मदतीसाठी 'आपला वडापाव' हा उपक्रम राबवण्यात राबवला आणि या उपक्रमांतर्गत १० ऐवजी ५ रुपयाने वडापाव विकून हि मदतीची रक्कम त्यांनी जमा केली, अहिवळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या उपक्रमाचा चांगला प्रचार केलेला. या आवाहनाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या बद्दल त्यांनी आभार देखील मानले आहेत. कारण जेव्हा सकाळी १० वाजता त्यांनी विक्री सुरु केली तेव्हा त्यांच्या स्टॉल वर एकाच झुंबड उडाली,रात्री ८ वाजेनंतर देखील गर्दीचा ओघ कमी व्हायचे नाव घेत नव्हता.

मराठी फीड तर्फे त्यांच्या ह्या कार्यास सलाम !!

वडापाव विकून केली एल्फिन्स्टन अपघातातील पीडित परीवालाला ८३ हजाराची मदत