Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जाणून घ्या अमिताभ बच्चनबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी

चार दशकातील सर्वात मोठा महानायक अँग्री यंग मॅन ,बिग बी ,चित्रपट सृष्टीचा शहेनशहा अशी अनेक विश्लेषण बहाल झालेल्या अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचा घेतलेला आढावा 11 ऑक्टोबर 1942 साली अलाहाबाद येथे बीग बी यांचा जन्म झाला. प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन हे त्यांचे वडील. अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव श्रीवास्तव. पण वडीलांनी कवी म्हणून स्वीकारलेले बच्च्न हेच नाव ते वापरु लागले. के. ए. अब्बास दिग्दर्शित सात हिन्दुस्तानी (1969) हा अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट. पण जंजीर या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.

म्युझिक व्हिडीओ

मिले सूर मेरा तुम्हारा (1988) I एबी बेबी (1996) I कभी नही (2002) I फिर मिले सूर (2010) I फिरसे (2017)
 पुरस्कार1984 : पद्मश्री I 2001 : पद्मभूषण I 2015 : पद्मविभूषण I 2007 : सिनेविश्वातील अमूल्य योगदानाबद्दल फ्रान्सचा 'नाईट ऑफ लेजिअन ऑफ ऑनर' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार
बिग बी विषयी माहिती नसलेल्या गोष्टी

 दूरदर्शनवरील 'देख भाई देख' या लोकप्रिय शोच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते.

 2002 मध्ये बच्चन यांनी स्वतः 'सोल करी फॉर यू अँड मी' नावाचं पुस्तक लिहिलंय.

 कोलकात्यात असे एक मंदिर आहे जिथे त्यांना देव समजले जाते. देवाच्या मूर्तीऐवजी त्यांचा फोटो आणि अग्निपथमध्ये घातलेले पांढरे बूट ठेवण्यात आलेत. तिथे जय श्री अमिताभ असे म्हटले जाते.

 एड्सच्या जनजागृतीसाठी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेल्या टीच एड्स या सॉफ्टवेअरसाठी त्यांनी आवाज दिला आहे.


 हेपेटायटस बी झाल्यामुळे त्यांचे 75 टक्के यकृत बिनकामी झाले आहे. गेली अनेक वर्षे ते केवळ 25% यकृतावर जगत आहेत.

 राज कपूर यांच्या नावावर दिल्या जाणाऱ्या फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराचे ते सन 1991मध्ये पहिले मानकरी ठरले होते.

 2000 मध्ये ते पहिले आशियाई होते ज्यांचा लंडनच्या प्रसिद्ध मॅडम तुसाँ वॅक्स म्युझिअममध्ये मेणाचा पुतळा बनवण्यात आला.

बिग बींचे काही उल्लेखनीय चित्रपट

 1970-1980 : सात हिंदुस्तानी, आनंद, अभिमान, बॉम्बे टू गोवा, जंजीर, नमक हराम, रोटी, कपडा और मकान, चुपके चुपके, दीवार, शोले, कभी कभी, हेराफेरी, अमर अकबर अँन्थोनी, कस्मे वादे, गंगा की सौगंध, त्रिशूल, डॉन, मुकद्दर का सिकंदर, मंझील, मिस्टर नटवरलाल, काला पत्थर, सुहाग, दोस्ताना, शान, नसीब, बरसात की एक रात

 1981-1990 : लावारिस, सिलसिला, कालिया, याराना, सत्तेपे सत्ता, बेमिसाल, नमक हलाल, शक्ती नास्तिक, पुकार, कुली, शराबी, मर्द, आखरी रास्ता, अंधा कानून, जादूगर, अग्नीपथ

 1991-2000 : अजुबा, खुदा गवाह, मृत्युदाता, बडे मियाँ छोटे मियाँ, सूर्यवंशम, मोहोब्बते

  2001-2010 : कभी खुशी गम, बागबान, खाकी, ब्लॅक, बंटी और बबली, सरकार, विरूध्द, कभी अलविदा ना कहना, निःशब्द, चीनी कम, सरकार राज, पा

 2010 नंतर : आरक्षण, सत्याग्रह, पिकू, पिंक, सरकार-3