Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तारक मेहता मधील मराठी कलाकार - Actors Of Tarak Mehta Ka Oolta Chashma

तुम्ही सर्व सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा बघत असाल पण त्या मालिकेत काही कलाकार मराठी आहे हे तुम्हाला माहित नसावा आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ

सोनालिका जोशी उर्फ माधवी भिडे : सोनालीने जोशी यांचा जन्म ५ जून १९७६ साली कोलकात्यात झाला . त्यांचे शालेय शिक्षण पण कोलकात्यात झाले .
नंतर पुढील शिक्षणासाठी त्या मुंबई ला आल्या. इतिहास या विषयात त्यांनी बी . ए . ची पदवी घेतली . ५ एप्रिल २००४ ला समीर जोशी याच्याशी त्यांचे लग्न झाले . त्यानंतर २००६ साली त्यांनी वारस सारेच सरस हा मराठी सिनेमा केला . त्यात त्यांचे काम उत्कृष्ट होते .

२००८ साली त्यांना तारक मेहता का उलट चष्मा या मालिकेत काम मिळाले .
त्या मालिकेतील माधवी भाभी हे पात्र खूप लोकप्रिय झाला . त्यामुळे लोक त्यांना माधवी भाभी नावाने ओळखायला लागले आहेत .

सोनालिका  यांना दोन मुली आहेत .

सोनालिका जोशीमंदार चांवडकर उर्फ आत्माराम भिडे  : मंदार चांदवाडकर यांचा जन्म २७ जुलै १९७६ रोजी मुंबई येथे झाला . आर . एम . भट शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले . पुढे त्यांनी मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये पदवी घेतली . २००७ साली त्यांनी मिशन चॅम्पियन या मराठी चित्रपटात काम केले . त्यानंतर त्यांनी दो फुल एक डाउत्फुल नावाची मालिका केली . ५ ऑगस्ट २००७ साली ते विवाहबद्ध झाले .
२००८ साली त्यांनी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत काम सुरु केले . त्यात त्यांनी आत्माराम भिडे या पात्राची भूमिका करत आहे . हे पात्र खूप प्रसिद्ध झाले . त्यांना सर्व लोक भिडे मास्तर नावाने ओळखायला लागले .
त्यांना एक मुलगा आहे .
तनुज महाशब्दे  उर्फ अय्यर : तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल कि अय्यर हा मराठी माणूस आहे . यांचा जन्म २४ जुलै १९७४ साली मुंबई येथे झाला . त्यांनी मारिन  कोम्मुनिकेशन मधून डिप्लोमा केला . ते सुरुवातीला तारक मेहता का उलट चष्मा साठी कथा लिहण्याचे काम करत होते पण दिलीप जोशीने त्याला बघून सांगितले कि ते अय्यर च्या भूमिकेसाठी ते अगदी योग्य व्यक्ती आहेत . लोकांनी अय्यर च्या भूमिकेला खूप पसंत  केले .

अंबिका रंजनकर उर्फ कोमल भाभी : यांचा जन्म ७ जून १९८३ या दिवशी झाला . त्यांचा शिक्षण मुंबईमधील कॉलेज मध्ये झाले . त्यानंतर त्यांनी २००८ साली तारक  मेहता मध्ये काम करायला सुरु केले काही ककाळातच त्या कोमल भाभी य नावाने प्रसिद्ध झाल्या .

Actors Of Tarak Mehta Ka Oolta Chashma