Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

१० एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं !!

१० एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं
संजय तिडके ह्या अकोला जिल्ह्यातील एक शेतकरी बांधवाने आपल्या जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने शेकडो एकर जमिनीचा पाणी प्रश्न सुटणार आहे ! अनेक सरकारी,सामाजिक अडथळे पार पाडून तिडकेनी हे यश संपादित केले आहे

आपले शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सर्वत्र हिरवळ निर्माण करण्याची जिद्द ह्यातूनच संजय तिडके ह्यांनी हा बंधारा उभा केला आहे.

सांगवी दुर्गवाडाच्या संजय तिडके ह्यांची स्वतःची ८० एकर जमीन नेहमी दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती शकत वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाण्याची वणवण असायची. यावर कायमचा उपाय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही मोलाची साथ दिली. काम झपाट्याने सुरुही झालं. मात्र तुम्ही अवैध वाळू उपसा करत आहात हे कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.

अनेकदा प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा विरोध चुकीचा आहे असं संजय तिडके ह्यांचे म्हणणे होते .

प्रशासनाच्या विरोधामुळे अनेक शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम काही दिवस थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.

सध्या १८ फूट उंच आणि २६० फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत २० लाख खर्च झाले आहेत.

सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्या. पण आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके यांनी दिली.
✊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✊