Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

Marathi Movie Review Baapjanm - बापजन्म

सध्या एकाच प्रकारचे सिनेमे येत राहतात तेच आई बाप कौटुंबिक मसाला ,रडगाणं इत्यादी . अशा प्रकारची तक्रार करणारे प्रेक्षक असतात त्यांच्यासाठी बापजन्म सिनेमा बनला असावा . कारण मराठी मध्ये एका नव्या लेखकाचा ,एका नव्या दिग्दर्शकाचा ,एका नव्या प्रकारच्या सिनेमाचा जन्म झाला आहे तो म्हणजे बापजन्म .
दक्षिणेतल्या सिनेमांनी खास करून मल्याळम सिनेमांनी गेल्या काही काळात जी क्रांती घडवली त्याच महत्वाचं कारण होता ते म्हणजे ओरिजिनल आणि ढासू कन्सेप्ट . मराठीमध्ये त्याचीच कामाकरता जाणवते . बापजन्माचं वैशिट्य हेच आहे कि कथेतील नावीन्य आणि विषयच वेगळेपण .
ट्रेलर बघून तुम्हाला वाटलं असेल कि स्टोरी काय आहे ते कळत . एकाकी बाप आहे तो दूर गेलेल्या आपल्या मुलांना जवळ आणण्यासाठी एक मिशन आखतो पण ते तेवढाच नाही आहे . त्याच्याही पुढे आहे हा बाप नेमका कोण आहे त्याचा नेमका मिशन काय आहे आणि त्यासाठी तो नक्की काय काय करतो आहे तो असा का वागतो आहे या सर्व प्रश्नांची उत्तर सिनेमा बघताना उलगडत जातात .

हा पारंपरिक पद्धतीचा कौटुंबिक सिनेमा नव्हे. तो त्यातील प्रासंगिक विनोदाने हसवतो , बापाच्या कारामतींनी फसवतो , उत्कंठा ताणून धरतो , निखळ असा मनोरंजन करतो आणि फार बोरही करत नाही बस मग आणखीन काय लागत आपल्याला सिनेमातून .

मध्यांतरानंतर या बापाचं मिशन थोडा रेंगाळत . कारण परिस्थिती निर्माण केलेली आहे यात काही गोष्टी बसवण्यात लेखकाची थोडी तारंबळ उडाली आहे .
पण बाकी सिनेमा छान जमून आलेला आहे .
निपुणची दिग्दर्शक म्हणून सुरुवात पण एकदम झक्कास झालेली आहे . रंगभूमीचा मोठा अनुभव त्याच्याकडे आहे . सचिन खेडेकर तर सध्या खूप जोरात आहे आता तर नुसता बॅट ला बॉल लागला तरी सिक्स असा त्यांचं झालेलं आहे . बाकी सर्व कलाकारांची काम उत्तम आहेत . या सिनेमाचा आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे गांधार सांगुरंच संगीत .

काहीतरी वेगळं , काहीतरी नवीन बघितल्याचा आनंद तुम्हाला बापजन्म नक्कीच देईल .

आमचे रेटिंग : ३.५ स्टार !