Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हुबेहूब रांगोळी काढणारा रायगडमधील अवलिया - रो‌‌हन सुनिल डंगर !


Rangoli-Artist

रांगोळी भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत रांगोळीचे नाव आणि तिची शैली यात भिन्नता असू शकते पण या मागे निहित भावना आणि संस्कृतीमध्ये पर्याप्त समानता आहे. रांगोळीची ही विशेषता तिला विविधता देते आणि तिच्या विभिन्न आयामांनाही प्रदर्शित करते. रांगोळीला सामान्यतः सण, व्रत, पूजा, उत्सव विवाह इत्यादी शुभ कार्यांत सुका आणि प्राकृतिक रंगांपासून बनवले जाते. यामध्ये साधारण भूमितीय आकार असू शकतो किंवा देवी देवतांच्या आकृत्या. याचे प्रयोजन सजावट आणि सुमंगल आहे.घरातील स्त्रिया पहाटे रांगोळी काढतात.

संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीची उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रंगांच्या सहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला बरेच महत्व आहे. मराठी विश्वकोशातील लेखक सुधीर बोराटे यांच्या मतानुसार सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे.[१] भारतीय संस्कृती कोशानुसार रांगोळी काढणे ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे


रो‌‌हन सुनिल डंगर या तरुणाने या रांगोळ्या काढल्या आहेत.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोहनच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत असतं.


Rangoli-Artist
Rangoli-Artist
Rangoli-Artist
Rangoli-Artist