Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

डॉ.हेमा साने ...एक अवलिया व्यक्तिमत्व !!



ह्या आहेत पुण्यातील वनस्पती शास्त्राच्या अभ्यासक डॉ.हेमा साने यांनी त्यांच्या बालपणापासून वीज वापरलीच नाही, असे काल 'चल हवा येऊ द्या' या कार्यक्रमात ऐकल्यानंतर या महान स्त्रीबद्दल खूप आदर वाटला.

उत्सुकता म्हणून त्यांची अजून माहिती काढली तेव्हा त्या M.Sc, Ph.D. in Botany & M.A, M.Phil in Indology आहेत असे वाचण्यात आले. त्यांचा इतिहासाचादेखील गाढा अभ्यास आहे. त्यांनी गरवारे कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख म्हणून काम केलंय... त्या पाणी विहिरीवरून आणतात! त्यांनी टेलिफोन वापरलेला नाही... त्यांनी वनस्पती शास्त्राशी संलग्न काही पुस्तके लिहिलीत.. पाठ्यपुस्तके लिहिलंत...तीही कंदिलाच्या उजेडात!

आता त्या सौर उजेचा दिवा वापरतात.नोकरीतील शेवटची दहा वर्ष जबाबदारी असल्याने त्यांनी लुना वापरली , तोपर्यंत त्या पायीच जात होत्या. त्यानंतरदेखील नोकरी व्यतिरिक्त इतरत्र त्या पायीच जात..!

आश्चर्य वाटते नं!.. आपण फक्त बोलतो...त्या प्रत्यक्ष आचरणात आणतात..!
.
'साधी राहणी उच्च विचारसरणी'चे तंतोतंत उदाहरण असलेल्या वयाची ७५ वी ओलांडलेल्या या उच्चशिक्षित व प्रेरणादायी स्त्रीच्या निसर्गाप्रती समर्पणाला साष्टांग दंडवत! __/\__ शक्य होईल...तेव्हा यांना नक्की भेटेन....

.
आसावरी इंगळे
(२४ मे, २०१६)