Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस प्रेरणादायी -Marathi Status Inspiration१.  वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! 

डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !२.  खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. 

सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.


३.  रस्ता नाही असे कधीही होत नाही, 

रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.


४. फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास 

आणि 
स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगला
माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, 
यावरुन मोजता येते. तर जगलास !


५.  ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही 

तो दिवस फुकट गेला अस समजा.


६. परमेश्वाराची कृपा होते 

पण, 
श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.


७.  प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा 

आणि 
प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.


८.  केवळ संपत्ती नव्हे 

तर उच्चं विचाराच्या भक्कम 
पायांवर यशस्वी माणसांच्या 
आयुष्याची इमारत उभी असते 


९. सुरूवात कुठून करावी,

ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या 
लाटा पायावर घेत बसलेलो आपण...

१०.  मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; 
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल 
सांगता येत नाही.

११.  जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका 
कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! 
ज्या झाडावर गोड फळ असतात 
त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!

१२.  परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय 
उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय...

१३.  लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला 
अंधारातच रहावं लागतं.


१४. बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. 

मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.

१५.  मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा 
दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..