Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मराठी स्टेटस- म्हणी - Marathi Status Mhani


१. 
अचाट खाणे अन मसणात जाणे अर्थ -  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास परिणाम नुकसान दायक असतात.

 २ . 
अति रागा भीक मागा

अर्थ -  ज्याला अतोनात राग येतो किंवा ज्याचा राग अनावर असतो त्याला पुढे भीक मागण्याची पाळी येते. इथे भीक म्हणजे याचना समजावी, ती कशाही साठी असु शकते.


 ३. 
अडला हरी गाढवाचे पाय धरी 
अर्थ – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

४. 
ति शहाणा त्याचा बैल रिकामा  

अर्थ– अति शहाणपणाने नुकसान होते
अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे 

अर्थ - फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची 

५ . 
अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे 

अर्थ - फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची 

 ६ . 
असेल त्या दिवशी दिवाळी 
नसेल त्या दिवशी शिमगा 
अर्थ - अनुकूलता असेल तेव्हा चैन आणि  नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी 

 ७. 

अग अग म्हशी मला कुठे नेशी 

अर्थ - स्वतःला हवी असणारी गोष्ट दुसऱ्याच्या आग्रहाखातर केली असे भासवणे 

 ८. 
अडली गाय फटके खाय 

अर्थ - एखादा माणूस अडचणीत सापडल्यावर त्याला हैराण करणे 
९. 
अळीमिळी गुपचिळी 

अर्थ - आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प राहणे 


 १०. 
अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीने मारलेला वर पाही 

अर्थ - सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धट पणाने तो आपला शत्रू बनतो . 


११. 
अर्धी टाकून सगळीकडे धावू नये . 

अर्थ - सबंध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी टाकू नये.


१२. 
असंगाशी संग प्राणाशी गाठ

अर्थ - अयोग्य माणसाशी संगत केल्याने प्रसंगी आपले प्राण गमवावे लागतात    

१३. 
अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.

अर्थ - अडाणी माणसाने एखादी गोष्ट केली असता परिणाम विपरीत होतो 


 १४. 
अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.

अर्थ - क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च 

१५. 
अढीच्या दिढी सावकाराची सढी.

अर्थ - अडलेला माणूस सरकारच्या पाशात सापडतो 


१६. असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.

अर्थ - स्वतः आळशी पनाणे काहीही उद्योग नं करता
दैवावर विसंबून सर्व सुखे मिळण्याची अपेक्षा धरणे . 


१७. अल्प बुध्दी, बहु गर्वी.

अर्थ - कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो 


 १८. 
अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.

अर्थ - आपले व्यंग आपणासच माहिती असते 

१९. 
सतील मुली तर पेटतील चुली.

अर्थ - संतती असल्यास हिस्सेवाटे होतीलच 


२० . 
असतील शिते तर जमतील भूते.

अर्थ - एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा फायदा होणार असेल त्याच्याभोवती माणसे गोळा होतात 


 २१. 
वळा देऊन कोहळा काढणे 

अर्थ - स्वार्थासाठी एखाद्याला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे 


२२. 
आपल्याच पोळीवर तूप ओढणे 

अर्थ - फक्त स्वतःचाच तेवढा फायदा करून घेणे 

 २३. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला 

अर्थ - ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो , तोच दोष आपल्या ठिकाणी असणे अशी स्थिती 


२४. 

आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी

अर्थ - आधी आचरण बिघडते मग वाईट दशा प्राप्त होते 

२५ . 
आ‌ईचा काळ, बायकोचा मवाळ.

अर्थ - आईकडे दुर्लक्ष करणे पण बायकोची काळजी घेणे 


 २६. 
आ‌ईची माया अन पोर जा‌ईला वाया.

अर्थ - फार लाड केले तर मुले बिघडतात 


२७ . 
आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.

अर्थ - योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग 


२८ . 
आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.

अर्थ - गरज असलेल्या माणसाला मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे 

२९ . 
आज अंबारी, उद्या झोळी धरी.

अर्थ - कधी वैभव तर कधी दैन्य 


३० . 
आठ हात लाकुड, न‌ऊ हात धलपी.

अर्थ - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती 


३१. 
आधी पोटोबा मग विठोबा - 

अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे


 ३२.  

आपण सुखी तर जग सुखी.

अर्थ - आपण आनंदात असलो कि सारे जग आनंदात असे वाटणे 


३३ . 
आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.

अर्थ - आपल्या जवळच्या वय्क्तीच्या दोषांवर पांघरून३४ . 
आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.

अर्थ - दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून अगोदरच स्वतःचे वाईट करून घेणे 


३५. 
आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

अर्थ - शिक्षा करणारे पण आपणच आणि 
ज्याला शिक्षा करायची आहे तोही 
आपल्यातीलच अशी अडचणीची परिस्थिती 

३६ . 
आपल्या कानी सात बाळ्या.

अर्थ - एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असे दाखवणे  ३७ . 
यजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार.

अर्थ - दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे 

३८ . 
आलीया भोगासी असावे सादर. 

अर्थ - आपल्या कर्मात जे काही लिहिले आहे ते भोगावे लागते, त्याबद्दल कुरकूर करू नये 

३९ . 

आसू ना मासू, कुत्र्याची सासू.

अर्थ - जेथे जिव्हाळा नाही तेथे प्रेम नाही 

४०. 
इकडे आड़ तिकडे विहीर.

अर्थ - दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे 


४१ . 
इच्छा तसे फळ. 

अर्थ - जशी वासना असते असे फळ मिळते 

४२ . 

इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.

अर्थ - ईच्छेप्रमाणे सगळे घडले असते तर सर्वांजवळ भरपूर धनसंपत्ती राहिली असती 

४३ . 
ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.

अर्थ - जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच 

४४ . 
उंदराला मांजराची साक्ष.

अर्थ - दोघेही एकमेकांचे साक्षीदार असल्याची परीस्थिती 

४५. 

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.

अर्थ - प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो 

 ४६ . 
उचलली जीभ लावली टाळ्याला.

अर्थ - विचार न करता बोलणे 

४७ . 
उडत्या पक्षाची पिसे मोजणे.

अर्थ - अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परिक्षा करणे 

४८ . 
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.

अर्थ - एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते

४९. 
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.

अर्थ - एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते

 ५० . 
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

अर्थ - अतिशय उतावळेपणामुळे होणारे मूर्खपणाचे वर्तन 

५१.  
त्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.

अर्थ - सर्व धंद्यात शेती उत्तम, त्यानंतर व्यापार आणि सरते शेवटचा क्रमांक नोकरी 

५२ . 
उथळ पाण्याला खळखळाट फार.

अर्थ - ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो 

५३ . 
उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.

अर्थ - उद्योगी माणसाला सर्व वैभव प्राप्त करुन घेता येते 

५४ . 
उधार तेल खवट.

अर्थ - उधारीच्या वस्तूत काही न काही खराबी किंवा उणीव असतेच 

५५ . 
उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.

अर्थ - श्रीमंत माणसाशी खुशात करणारे गोळा होत असतात 

५६ . 
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.

अर्थ - येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे 

५७ . 
उसना पसारा देवाचा आसरा.

अर्थ - सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे 

५८ . 
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.

अर्थ - एखादी गोष्ट चांगली असली म्हणून ती फार उपभोगू नये

५९ . 
ओल्याबरोबर कोरडेही जळते 

अर्थ - वाईटाबरोबर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते 

६० . 
अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.

अर्थ - गरजवंताला अक्कल नसते 

६१ . 
गावरचे लेणे, जन्मभर देणे. 

अर्थ - दागिन्याकरिता कर्ज कारुन ठेवायचे आणि ते जन्मभर फेडित बसायचे 

६२ . 
अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.

अर्थ - परिश्रम एकाचे, फायदा दुसऱ्याचा 

६३ . 
अंधारात केले पण उजेडात आले.

अर्थ - कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच 

६४ .
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - 

अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

६५ . 
गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने.

अर्थ - आई काम करून करून थकते व तिचे मुल तिच्या मागे फिरून थकुन जाणे 

६६ . 
चांदणे चोराला, उन घुबडाला.

अर्थ - चांगल्या गोष्टी दुर्जनांना आवडत नाहीत 

६७ . 
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - 

प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

६८ . 
चोर सोडून संन्याशाला सुळी.

अर्थ - खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे 

६९ . 
चोरीचा मामला हळू हळू बोंबला.

अर्थ - पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते 

७० . 

जशी कामना तशी भावना.

अर्थ - जशी मनात इच्छा असते तशी भावना बनते 


७१ . 
जशी देणावळ, तशी धुणावळ 

अर्थ - पैशाप्रमाणे काम करणे  

७२ . 
जशी नियत तशी बरकत 

अर्थ - ज्याप्रमाणे आपली वागणूक असेल त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळते 

७३ . 

जसा भाव तसा देव.

अर्थ - ज्याप्रमाणे देवाची भक्ती त्याप्रमाणे फळ मिळते 


७४ . 
जसा भाव तसा देव.

अर्थ - ज्याप्रमाणे देवाची भक्ती त्याप्रमाणे फळ मिळते 

७५ . 
जातीसाठी खावी माती.

अर्थ - जातीसाठी जे करायचे ते करणे, प्रसंगी कमीपणाही पत्करणे 

७६ . 
जावयाचं पोर हरामखोर.

अर्थ - जावयाच्या पोराला कितीही चांगले वागवा तरीही तो उपकार स्मरत नाही 


७७ . 
जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.

अर्थ - ज्याच्याकडून काही लाभ होत असेल त्याचीच लोक खुशामत करतात 

७८ . 
जिकडे सु‌ई तिकडे दोरा.

अर्थ - प्रमुख व्यक्तीच्या मागे त्याच्या हाताखाली काम करणारे लोक असतात 

७९ . 
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.

अर्थ - मूर्ख अथवा निर्बुद्ध माणसाचा घरोघरी उपहास होतो 


८० . 
झाकली मूठ सव्वा लाखाची -   

दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

८१ . 
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही -   

कष्टाशिवाय यश मिळत नाही

८२ . 
ढवळ्याशेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला.

अर्थ - वाईट माणसाच्या संगतीत राहून चांगलाही बिघडतो 

८३ . 
ढोंग धतोरा, हाती कटोरा.

अर्थ - ढोंगी माणसाच्या नादी लागल्यास शेवटी नुकसान होते 

८४ . 
ताकापुरते रामायण सांगणे 

अर्थ - काम साधण्यासाठी दुसऱ्याची खुशामत करणे 

८५ . 
दक्षिणा तशी प्रदक्षिणा.

अर्थ - जशी मजुरी तसे काम

८६ . 
दगडापेक्षा विट म‌ऊ.

अर्थ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसान करतात 

८७ . 
दहा गेले पाच उरले.

अर्थ - आयुष्याची बरीच वर्षे निघुन गेलीत , आता फार थोडी राहिलीत 

८८ . 
दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.

अर्थ - सामान्य माणसे मेली तरी वाईट वाटत नाही 

पण 
ज्याच्यावर शेकडो लोक अवलंबुन आहेत 

तो 
जर मरण पावला तर अतिशय वाईट वाटणे


८९ . 
दांत कोरून पोट भरतो.

अर्थ - मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करणे 

९० . 
दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.

अर्थ - थोडे थोडे करीत गेल्यास बरेच मोठे होते 


९१ . 
दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.

अर्थ - दुसऱ्याची चाकरी किंवा सेवा करून जे अन्न मिळेल ते खाऊन जगणे 

९२ . 
दिवस बुडाला मजूर उडाला.

अर्थ - मजूर केव्हाही आस्था ठेऊन काम करीत नाही 

९३ . 
दिव्याखाली नेहमीच अंधार.

अर्थ - मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच 

९४ . 
दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे.

अर्थ - एखाद्या बाबतीत अद्दल घडली तर मनुष्य वेळोवेळी सावधगिरीने वागतो 

९५ . 
दुभत्या गा‌ईच्या लाथा गोड.

अर्थ - ज्याच्यापासून आपल्याला लाभ होतो त्याच्याकडून होणारा त्रासही सहन केला पाहिजे 

९६ . 
दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.

अर्थ - दृष्ट माणसाबरोबर संगती करण्यापेक्षा एकटे राहणे बरे 

९७ . 

दृष्टी आड सृष्टी.

अर्थ - आपल्यामागे काय चालले आहे याची चिंता करू नये 

९८ . 
दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.

अर्थ - अनेक गोष्टींचे कामचलाऊ ज्ञान असून एका गोष्टीत कुशल असणे 

९९ . 
देश तसा वेश.

अर्थ - परिस्थितीनुरूप वर्तनात बदल होणे 

१००. 

दैव देतं अऩ कर्म नेतं.

अर्थ - नशिबामुळे आपला उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते