Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मेरसल ( mersal) चित्रपटात सरकारला नको असलेला संवाद मराठीत ..... !

 Tamil-Film-Mersal-dialogue

मेरसल ( mersal) चित्रपटात सरकारला नको असलेला संवाद मराठीत...

हिरो म्हणतो, '' सिंगापूर मध्ये 7 % GST आहे, तिथल्या लोकांना सरकार मोफत आरोग्य सेवा पुरवते. पण भारत सरकार 28 % GST घेते मग जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा का पुरवत नाही!
का ?
औषधांवर आपण 12 % टॅक्स देतो, पण दारूवर टॅक्स आकारला जात नाही! आपल्या सरकारी दवाखान्यात ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नसतात, त्यामुळं शेकडो मुलं दगावतात, का? तर माहीत पडतं 2 वर्ष सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपनीचे पैसे दिलेले नसतात. दुसऱ्या एका सरकारी दवाखान्यात डायलिसिस करताना 4 रुग्ण दगावतात, का? तर मध्येच वीज गेली म्हणून... लाज वाटली पाहिजे , आपल्या दवाखान्यात वीज गेल्यानंतर वापरण्यासाठी पॉवर बॅकअप नसतो... काचेत ठेवलेली ( incubator) ठेवलेली लहान मुलं उंदीर चावल्यामुळे मृत्युमुखी पडतात.....

हालत अशी आहे की लोकांना सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याची भीती वाटते.. हि भीती नाही, खाजगी दवाखान्यात लोक जावेत म्हणून केलेली गुंतवणूक आहे....''
दुसऱ्या वादग्रस्थ सीन मध्ये एकाचे चोर पाकीट मारतो, त्या पाकिटात पैसे नसतात, ज्याचं पाकीट मारलं गेलं तो म्हणतो,''थँक्स टू डिजिटल इंडिया, पाकिटात पैसेच नाहीत.''
व्यक्तिशः मला या डायलॉग मध्ये आक्षेपार्ह काही वाटत नाही.. या घटना भारतात घडलेल्या आहेत... चित्रपट हा समाजाचा आरसा असतो, अपवाद आहेत. समाजाचं चित्र कलेतून उमटत असत। टॉयलेट चित्रपटात 'सरकारची स्तुती' केली की ती कलाकारी असते, आणि चित्रपटात वास्तव दाखवलं की तो 'अपप्रचार' असतो असे सरकारला वाटत असावे....
असली सेन्सॉरशिप मला मान्य नाही. कुणीही ती मान्य करू नये!
चित्रपट हा काल्पनिक असतो, अशी पाटी/ सूचना दाखवली जाते आधी... तरी लोक ...