Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मुंबईच्या रेल्वे स्थानकांनी घेतला मोकळा श्वास - Mumbai Railway Station Free from feriwala!

दादर स्थानक झाले फेरीवाल्यांपासून मुक्त !

मुंबई मधील एल्फिस्टन स्टेशन मध्ये झालेल्या अपघातानंतर उसळलेल्या जनक्षोभाचा धाक घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबई मधील दादर स्टेशन फेरीवाल्यांपासून आज मुक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे ह्यांची काढलेल्या संताप मोर्च्याने आणि शिवसेना मंत्र्यांनी घातलेल्या गोंधळाने दोन पावले मागे येत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ह्यांनी एक प्रमुख निर्णय घेतला असावा अशी आशा करतो !

आज सकाळी जेव्हा प्रवासी नेहमी गजबज असलेल्या दादर स्टेशन वर गेले तेव्हा तिथे असलेले मोकळे रेल्वे पूल आणि स्टेशन परिसर बघून नक्कीच मुंबईकरांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता मात्र पुढचे किती दिवस हि शिस्त कायम ठेवली जाईल हे बघणे उत्सुकतेचे असेल ...
या आधी देखील चांगले अनेक बदल हे पैसे कमवायचा लालसे मधून निवळून गेल्याचे दिसून आले आहे ...
अशी आशा करू कि रेल्वे बदलाची नवीन नांदी असेल ... उद्धव ठाकरे ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन ह्या मुद्द्यावर सरकारचे आणि जनतेचे अभिनंदन केले आहे