Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अजय देवगण ने का स्वीकारला तानाजी ? - Why Ajay Devgan Accepts Tanaji Movie

शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अनेक ग्रंथ,पुस्तके,मालिका इत्यादी गोष्टींमधून आपल्या समोर आला आहे . त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा आपण वाचली आहे . काही मालिकांमधून पहिलीदेखील आहे . याच गाथेवर आता बॉलीवूडची नजर पडली आहे आहे .

कारण आता अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे . अजयचे म्हणणे आहे कि , अशी व्यक्तिरेखा पहिली नाही . साऱ्या जगाला माहिती आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांनी किती महान कार्य केले आहे . पण ते कार्य पार पाडताना त्यांच्या विश्वासू आणि एकनिष्ठ मावळ्यांची दिलेली साथ तितकीच मोलाची होती . आज आपण महाराजांबद्दल खूप काही बोलतो पण त्यांना सात्रह देणाऱ्या शूर पराक्रमी तानाजी मालुसरे यांच्याबद्दल कोणीच बोलतांना दिसत नाही . मला हि व्यक्तिरेखा लोकांसमोर आणायची आहे .

अजय देवगण ने का स्वीकारला तानाजी ? - Why Ajay Devgan Accepts Tanaji Movie


या सिनेमात स्पेशल इफेक्टचा वापर करावा लागणार आहे . आता लोक याला किती पसंती देता हे बगण्यासारखं असेल . ओम राऊत दिग्दर्शित तानाजी या सिनेमाच्या निमित्ताने लोकांसमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या पराक्रमी मावळ्यांच्या पराक्रमाची शूर गाथा पुन्हा एकदा लोकांसमोर नव्याने यासमोर येणार आहे . आधी लगीन कोंढाण्याचा मग आमच्या रायबाचं असं म्हणणाऱ्या तानाजीची गाथा पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे