Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

रविचंद्रन अश्विन ने तोडला ३६ वर्षे जुना विक्रम... घेतल्या सर्वात वेगवान ३०० टेस्ट विकेट्स

भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथील कसोटी सामन्यात ३०० विकेट्स चा टप्पा पार केला. अवघ्या ५४ कसोटी सामन्यात अश्विन ने २५.०६ च्या सरासरीने ३०० बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे हे करत असताना अश्विन ऑस्ट्रेलिया चा वेगवान गोलंदाज डेनिस लिली च्या ३६ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. लिलीने ३०० कसोटी विकेट्स घेण्यासाठी ५६ सामने घेतले होते. विशेष म्हणजे अश्विन च्या नावावर याआधी सर्वात वेगवान २५० कसोटी बळी घेण्याचा विक्रम सुद्धा आहेच आणि तो सुद्धा डेनिस लिलीचा मागे टाकतच. अश्विन ने आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध खेळला होता आणि अवघ्या ६ वर्षात त्याने आपल्या नावावर अनेक विक्रम करून घेतले आहेत. आज अश्विन ३१ वर्षाचा आहे आणि जर असाच सातत्यपूर्ण खेळ त्याने पुढील काही वर्षे सुरु ठेवला तर मुरलीधरन (८०० बळी) , शेन वॉर्न (७०८ बळी) आणि अनिल कुंबळे (६१९ बळी) यांच्या पंगतीत अश्विन नक्कीच जाईल. यापुढे अश्विनचे लक्ष्य हरभजन सिंग च्या ४१७ विकेट्स चा पल्ला पार करून कुंबळे नंतरचा सर्वाधिक बळी  घेणारा फिरकी गोलंदाज होणे असेल. परंतु यासाठी अश्विन ला परदेशात कसोटी सामने खेळत असताना जास्त प्रभावी कामगिरी करावी लागेल. आजपर्यंत अश्विन ने परदेशात २० सामन्यात अवघ्या ८४ विकेट्स घेतल्या आहेत.  

अश्विन हा एक अतिशय चांगला कसोटी फलंदाज सुद्धा असून त्याने आजपर्यंत ४ शतके ठोकत ३१.५५ च्या सरासरीने  २,००० हुन अधिक धाव केल्या आहेत.