Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

प्रियकराला पाठवायची रूम पार्टनरचे फोटो - जीवाशी आले प्रकरण


कल्याणजवळ रेल्वे रुळावर आढळलेल्या मुलीचा आणि मुलाच्या मृतदेह प्रकरणाने एक भयावह वळण आज घेतले. काही दिवसांपूर्वी ह्या जोडीने तिथे आत्महत्या केली होती, पोलीस तपासामध्ये या आत्महत्येचे गूढ उकलले असून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वसतिगृहामध्ये शिक्षण घेणाऱ्या ह्या मुलीने आपल्या सोबत राहणाऱ्या मुलींचे नग्न अवस्थेतील फोटो काढून आपल्याच प्रियकराला पाठवले होते असे समजते. आणि हि गोष्ट उघड झाल्यामुळेच आलेल्या दडपणामुळे दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला.
ह्या दुर्दैवी जोडीचे नाव सुरेश  आणि वृषाली  आहे असे समजते. सुरेश  हा एका खासगी दवाखान्यात काम करत होता. तर, वृषाली सेंट जॉर्ज रुग्णालयात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. सुरेश ने सांगितले म्हणून वृषालीने आपल्या दोन सोबत राहणाऱ्या मुलींचे नग्न छायाचित्र काढून त्याला पाठवले. दोघांचे संभाषण संबंधित तरुणीने २१ सप्टेंबर रोजी वाचले. त्यानंतर आपले नग्न फोटो वृषालीने पाठवले असल्याची धक्कादायक बाब त्यांना समजली. वृषालीला ह्या गोष्टीचा त्यांनी जाब देखील विचारला. सुरेशच्या सांगण्यावरून कृत्य केले असल्याची कबुली वृषालीने दिली तेव्हा होती.
मग दोघीनी तिला लिखित स्वपरुपामध्ये कबुली जवाब मागितला आणि सुरेशसोबत असलेले संबंध तोडण्यास सांगितले पण काही दिवसातच त्यांचे संभाषण परत सुरु झाले. अखेर पिडीतांनी वृषालीला पोलिसांमध्ये त्या प्रकरणाची तक्रार करण्याची धमकी दिली. ह्यामुळे वृषाली घाबरली आणि निघून गेली ती रात्री परतलीच नाही . वस्तीगृहाच्या अधिकाऱ्यांना पोलिसांना कळवले आणि अखेर २३ सप्टेंबरला  वृषाली आणि तिचा प्रियकर सुरेश यांचा मृतदेह कल्याणजवळ आढळला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात वृषाली आणि सुरेश यांच कृत्य समोर आले. तपासादरम्यान पोलिसांना वृषालीने आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी मिळाली आहे.