Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

डॉ. रखमाबाई राऊत यांना गुगलने केला सलाम - जाणून घ्या त्यांच्या विषयी !

आपल्याला नेहमी  सकाळपासून गुगलवर हॉस्पिटलमध्ये गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेल्या एका महिलेचा फोटो आणि तिच्या सभोवती महिला रुग्णांची सुश्रूषा करताना काही नर्स दिसतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे कि ही महिला कोण आहे ? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो कि ही महिला अजून कोणी नसून प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर रखमाबाई राऊत आहेत . डॉक्टर रखमाबाई राऊत ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत .  यांची आज १५३  वी जयंती असून त्यानिमित्त गूगलने खास डूडल तयार करून त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. म्हणून आज आपण रखमाबाई यांचा जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया .
 २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबई येथे झाला . रखमाबाईं यांचा वयाच्या ११ व्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्याशी बालविवाह   झाला. तरीसुद्धा त्यांनी माहेरी राहून संपूर्ण वैद्यकीय शिक्षण घेतले .  रखमाबाई यांनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिन येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले .  त्यानंतर त्यांनी तब्बल ३५ वर्ष वैद्यकीय सेवा केली . त्यानंतर त्यांचे पती  दादाजी यांनी  मार्च   १८६४ मध्ये मुंबई हायकोर्टात वैवाहिक हक्कासाठी याचिका दाखल केली आणि रखमाबाईंनी त्यांच्यासोबत राहावे म्हणून मागणी केली.

त्यावेळी कोर्टाने असे सांगितले कि  दादाजी यांच्यासोबत राहा किंवा तुरुंगात जा, तरीसुद्धा रखमाबाई हरल्या नाहीत . त्यासाठी त्यांनी कायदेशीर रित्या लढा दिला .त्यावेळी  या केसमुळे तत्कालीन समाज सुधारकांनी स्रियांच्या विवाह आणि शारीरिक संबंध सहमतीच्या वयाचा मुद्दा उचलून धरला आणि  त्यानंतर ब्रिटिश सरकारने consent of age act 1891 ला जाहीर  केला.

 रखमाबाईंनी बालविवाहाच्या प्रथेविरोधात खूप मोठा लढा दिला होता . ज्या काळात महिलांना साधे घराबाहेर सुद्धा जाऊ देत नव्हते त्या काळात  त्या काळात मराठमोळ्या रखमाबाई भारतातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या होत्या .बालविवाह हि प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिले आहे असे हे योगदान भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे .

अशा या लढाऊ रखमाई राऊत यांचे वयाच्या ९१  व्या वर्षी म्हणजेच २५  सप्टेंबर१९५५  ला निधन झाले.