Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

इन्शुरन्स खरेदी करताय? मग वाचाच !स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनामुळे आपण, आपलं कुटुंब, आपले प्रियजन सुखी व्हावे यासाठी एखादी तरी चांगली इन्शुरन्स योजना आपल्या हाती असणं गरजेचंच बनलंय. मात्र चांगली सेवा निवडावी कशी? हा प्रश्न पडलाय. म्हणून खास तुमच्यासाठी इन्शुरन्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवयाच्या ते पाहुयात...
1) आर्थिक पोर्टफोलिओत आपल्या आर्थिक गरजांचं गणित मांडा आणि त्या पूर्ण करणा-या योजनेचीच निवड करा.
2) कुठलीही इन्शुरन्स योजना खरेदी करण्याआधी त्याची संपूर्ण माहिती करुन घ्या. इन्शुरन्स योजनेचं माहिती पुस्तक व्यवस्थित अभ्यासा.
3) संबंधित योजनांची वैशिष्ट्यच्या अभ्यास करुन पहा.
4) तुमच्यावरची आत्ताची आणि भविष्यातील जबाबदारी, मालमत्ता, उत्पन्न, वय आणि सोबतच जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन योग्य ती पावलं उचलावीत.
5) कमी इन्शरन्स घेणं टाळावं. कारण कमी इन्शुरन्स घेणं म्हणजे इन्शुरन्स न घेतल्याबरोबर आहे.
6) वर्षभरात तुमची जेवढी कमाई असेल. त्याहून दहापट तुमचा इन्शुरन्स असावा.
7) तुमच्या गरजांशी पॉलिसीचा कालावधी जुळवून घेणं कधीही चांगलं.
8) कुणावर अवलंबून न राहण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसीचा कालावधी शक्यतो दीर्घ मुदतीचा असावा.
9) आरोग्य ठणठणीत असतानाच इन्शुरन्स पॉलिसी काढा. कारण अनारोग्य असल्यास किंवा वय वाढलेलं असल्यास संबंधितांना इन्शुरन्ससाठी अधिक प्रिमियम भरावा लागतो.
10) क्लेम सेटलमेंटमध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी इन्शुरन्स पॉलिसीसाठी सारं काही सत्य सांगावं. इन्शुरन्स योजनेच्या प्रस्तावातली माहिती संपूर्ण भरावी.
11) कुठल्याही इन्शुरन्स पॉलिसीचा अभ्यास करा. त्याची फी तसंच सेवांची तुलना करा. त्यामुळे निर्णय घेणं सोपं होतं.
12) अनोळखी अर्थ सल्लागाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इन्शुरन्स योजना लगेच स्वीकारु नका. संबंधितांची विश्वासार्हता आधी तपासून पहावी. जसे कि, ओळखपत्र आणि इतर बाबी