Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कोण आहे हो सर्वात सुंदर पोलीस अधिकारी ? छे छे, हि तर ...

Kainaat-Arora-as-Punjab-Police

सोशल मीडियावर सध्या  एका महिला पोलिसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .असे सांगण्यात येत आहे कि  ही महिला पंजाब पोलिस दलातील नवी एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर) असल्याचे नेटीझन्स आहेत. सध्या सर्वत्र या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या सौंदर्याबाबत जोरदार चर्चा चालू  आहेत की ही
महिला पोलीस बॉलीवूड कलाकारांपेक्षा सुंदर आहेत .

फोटोमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव  हरलीन कौर आहे असे सांगण्यात येत आहे  पण या व्हायरल फोटोंमागील सत्य वेगळेच आहे. खरतर हे फोटो अभिनेत्री कायनात अरोराचे आहे .ती पंजाबी चित्रपट ‘जग्गा जेऊंदा ए’साठी पोलिसांच्या वेशात आहे.ती खरोखर पोलीस ऑफिसर नाही आहे . ही फक्त सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात आली आहे . लोकांना फसवण्यात आल आहे . या महिलेचा पोलीस दलाशी काही एक संबंध नाही आहे .

कायनात ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत स्पष्टीकरणही दिळे आहे. माझे फोटो पंजाब पोलिस दलातील एसएचओ असल्याचे सांगून शेअर केले जात आहेत. पण ते पूर्णतः  खोटे असल्याचे कायनात ने  सांगितले आहे . . कोणीतरी चित्रीकरणादरम्यान माझे नकळत  फोटो काढून, पंजाब पोलिस दलातील नवी एचएसओ असे सांगून शेअर केले असल्याचे कायनात म्हणाली आहे .


कायनाचे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले. ट्विटर, फेसबुकसह व्हॉट्सअॅपवर ते शेअर होऊ लागले. कायनात ने आपल्या करियर ची सुरुवात  २०१०मध्ये अक्षय कुमारच्या ‘खट्टा-मीठा’ चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते .  यानंतर ती २०१३मधील ‘ग्रॅण्ड मस्ती’मुळे चर्चेत आली. ती मल्याळी चित्रपट लैला ओ लैला, तामीळचा मनकथा, पंजाबी चित्रपट फरारमध्ये दिसली होती . ती आता पंजाबी चित्रपट ‘जग्गा जेऊंदा ए’मध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.