Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

विक्रोळी मध्ये मनसे कार्यकर्त्यान्वर हल्ला ... मग अमित राज ठाकरेंनी हे केले !

विक्रोळी मध्ये मनसे कार्यकर्त्यान्वर हल्ला
काल रात्री मुंबई मधील विक्रोळी टागोर नगर मध्ये मराठी पाट्याचे पत्रक देताना तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यावर हल्ला केला गेला. ह्या पाशवी हल्ल्यामध्ये मनसे उपविभाग प्रमुख अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरा पर्यंत ह्या हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि रात्री १-२ च्या सुमारास हजारोच्या संख्येने मनसैनिक विक्रोळी येथे जमा होऊ लागले.
विक्रोळी मध्ये मनसे कार्यकर्त्यान्वर हल्ला

काय होते पत्रक ?
कायदेशीर नियमाप्रमाणे प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाचे नाव अन्य कुठल्याही भाषेत लिहिले तरी मराठी मध्ये पण लिहिणे बंधनकारक आहे असे नमूद करणारे पत्रक वाटपाचा कार्यक्रम काल सुरु होता परंतु फेरीवाल्याचा मुद्दा सध्या चिघळलेला असल्याने मनसैनिक आणि फेरीवाले हे परत आमने-सामने आल्याचे काही लोकांचे म्हणणे पडले आणि त्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. हे प्रकरण जसे जसे रात्री तापू लागले तसे तसे व्हॅट्सऍप वर फोटो व्हायरल झाले.
amit raj thackeray visit vikroli 
अमित राज ठाकरे धावले भेटीला 
जसे रात्री १ नंतर जखमींना उपचारार्थ हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले तसे राज ठाकरे ह्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे ह्यांनी रात्री २ च्या सुमारास जखमींची चौकशी करण्यास हॉस्पिटल कडे कूच केली. तिथे वेळ व्यतीत केला. त्यांची कुठलीही प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली नाही. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या मुद्द्यावर काही भूमिका मांडेल अशी अपॆक्षा आहे  
इतक्या रात्री अमित ठाकरे येतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती पण त्यांच्या ह्या कृत्याने नक्कीच मनसैनिक सुखावले असतील .

amit raj thackeray