Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

.. तर तुम्ही पण ५ कोटी कमवाल - पदमवती चित्रपट !

 

आगामी चित्रपट ‘पद्मावती’चा रिलीजींगचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. संजय लीला भंसाळी यांचा हा सर्वात महत्वाकांक्षी सिनेमा मानला जातो. भन्साळी १० वर्ष ह्या चित्रपटासाठी काम करत होते परंतु आता राजपूत समाजाच्या लोकांनी चित्रपट रिलीज होण्यापूर्वी थिएटरमध्ये आग लावण्याची आणि तोडफोड तसेच हिंसा भडकवण्याची धमकी दिली आहे. तसेच

जो व्यक्ती संजय लीली भंसाळींचे शीर कापून आणेल त्याला तब्बल 5 कोटींचे बक्षीस दिले जाईल 

अशी घोषणा उत्तरप्रदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्याने केली आहे. चित्रपटात रणवीर सिंह खिलजी, दीपिका राणी पद्मिनी आणि शाहीद कपूर राजा रावल रतन सिंहच्या भूमिकेत आहे. ह्या चित्रपटाच्या ट्रेलरलाच करोडो लोकांनी पहिले आहे.

ह्या चित्रपटामध्ये अलाउद्दीन खिलजीचे महात्म्य चित्रपटामध्ये दाखवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. रणवीरसिंगचा रोल आकर्षक व्हावा म्हणून त्याची चुकीची कृत्येदेखिल अतिशयोक्ती करत दाखवली आहेत. तसेच राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात ड्रीम सिक्वेन्सही शूट करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यात आक्षेपार्ह घूमर डान्समुळेही विरोध वाढत आहे . चित्रपटात राजपूत समाजाची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्याचे कारण म्हणजे घूमर नृत्य पुरुषांसमोर केले जात नाही. तसेच ह्या चित्रपटामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल आणि इतिहास बदनाम होईल असेही राजपूत नेत्यांचे म्हणने आहे ..

आता हे ५ कोटी रुपये कोण कमवतो हे बघणे उत्सुकतेचे ठरेल !!
तुम्हाला काय वाटते ह्या वादाबद्दल नक्की कमेंट कराल