Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

रवी जाधवच्या विवादित 'न्यूड' चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पहिला का? या बघा !!

चतुरस्त्र दिग्दर्शक आणि आता अभिनेता देखील असलेल्या रवी जाधव ह्यांच्या विवादित चित्रपटाचा ट्रेलर त्यांनी आज लाँच केला ... अप्रतिम ! हा एकच शब्द तुम्ही तोंडातून काढाल असा हा ट्रेलर आहे जो बघताच मनात घर करून जातो 
आपण फॉरेनचा कमी कपड्यांचा fashion sense उचलणार, पण आपला दृष्टीकोन वस्रात बांधून ठेवण्यापुरताच का? आपण वास्तव स्विकारायला का इतके घाबरतो? ते स्वत:त पचवण्याची आणि इतरांमध्ये हळुहळू रिझवण्याची हिंमत आपल्यात नाही का? या क्षेत्रात करियर करणं सोपं नाही. खूप जिगर लागतं. या कलेला जवळ केलं म्हणून कित्येकांना घरचे नातेवाईक दुरावलेले आहेत. कलेविषयी प्रेम वगैरे सगळं असतंच, पण पैशाचं सोंग घेता येत नाही आणि अशा ठोस कारण न देता केवळ विषयाचा अंदाज घेऊनच एखाद्या कलाकृतीला हद्दपार करणा-या देशात चित्रकला, शिल्पकला यांच्या जोरावर पैसा कमावणं सर्वांसाठी सोपं नसतं.
सिनेमा मी पाहिलेला नाही. याचा टीजरच काळजाला हात घालतोय. या विषयावर काहीतरी काम करण्याचा विचार निर्माते-दिग्दर्शक रवी जाधव यांच्या मनात आला आणि त्यांनी धाडसाने तो विचार पूर्णत्वाला नेला, यासाठीच त्यांना मानलं! जिगर! या सिनेमाचा जो विषय आहे, त्याबाबत बोलायचं तर वास्तवात ज्या स्त्रीयांनी अशी कामं केली असतील, त्यांच्याकडेही जिगर आहे की नाही! मग तिच्या बाह्यांगाकडे पाहण्यापेक्षा तिच्यातल्या हिमतीला दाद द्यायला नको?
काही ठराविक क्षेत्रांबाबतीत असं होतं की त्या क्षेत्राच्या बाहेरच्या मंडळींना हे आमच्यासाठी नाहीच, असा काहीतरी समज झालेला असतो. त्यामुळे बरेचदा त्या क्षेत्रातल्या घडामोडी त्या ठराविक लोकांमध्येच घुटमळत राहतात आणि ते क्षेत्र सामान्यांना नकळतपणे अधिकाधिक परकं होत जातं. रवी जाधव हे चित्रपटासारख्या जनसामान्यांच्या माध्यमातून हा विषय लोकांसमोर आणत आहेत, त्याबद्दल पुनश्च त्यांचं एकदा अभिनंदन