Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जिन्स घालता ना ? मग जाणून घ्या जीन्स बद्दल काही गोष्टी !

 
सध्याच्या तरूणाईत सर्वाधीक प्रसिद्ध कोणते गारमेंट असेल तर, ते म्हणजे जीन्स. जीन्सला सगळ्यात कॉमन आणि कंम्फर्टेबल आउटफिट म्हणूनही ओळले जाते. मुलगा असो किंवा मुलगी त्याच्याकडे एकतरी जिन्स पॅंट असतेच. वरून दिसायला जीन्स कितीतरी साधी वाटली तरी, तिची कहानी मात्र भलतीच भारी आहे. विषेशत: तिच्या निळ्या रंगाची. तर, जाणून घ्या काय आहे. जीन्सचा इतिहास

एखाद्या वस्तूला जेव्हा नाव मिळते तेव्हा, त्याची कहाणीही  तशीच रंजक असते. ती वस्तू जर सर्वसामान्य वापरातली आणि तितकीच प्रसिद्ध असेल तर, मग काही बोलूच नका. जीन्सची कहानीही तशीच रंजक आहे. जीन्सचा जन्म १९ व्या शतकात फ्रान्समधील निमस  नावाच्या एका छोट्या शहरात झाला. जीन्स वापरण्यासाठी जे फॅब्रीक वापरले जाते त्याला फ्रेंच भाषेत Serge म्हटले जाते. त्यावरून जीन्सचे सुरूवातीचे नाव Serge de Nimes असे पडले. मात्र, हे नाव भलतेच मोठे असल्यामुळे त्याचे Serge असे नामकरण करण्यात आले. कदाचीत आपण म्हणाल की ही झाली डेनिम्सची गोष्ट. पण जीन्स बद्धल काय?अंगभूत असलेला मजबूतपणा आणि टिकावूपणामुळे अल्पावधीतच ही डेनिम्स Europe मध्ये भलतीच लोकप्रिय झाली. ही लोकप्रिय डेनिम्स जास्तीत जास्त Genoa सेलर्स म्हणजे नावाडी वापरत असत. हे नावाडी जेव्हा जेव्हा फ्रान्समध्ये जात असत तेव्हा जीन्स मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असत. ही डेनिम्स सेलर्समध्ये इतकी प्रसिद्ध झाली की, सेलर्समधील तिची लोकप्रियाता पाहून जीन्सच्या उत्पादकांनी आदर म्हणून या जिन्सला निकनेम दिले. हे निकनेम होते जीन्स.

जगातली सर्वात पहिल्या जीन्सला निळा रंग देण्यात आला. जिन्सला निळा रंग देणामागेही एक खास कारण होते. सुरूवातीच्या काळात मजूर आणि कष्टाची कामे करणारा वर्ग जीन्स वापरत असे. कष्टकरी वर्गाचे कपडे नेहमीच घाणेरडे आणि मळलेले असतात. त्यामुळे जीन्सवर बसलेला मळ लक्षात येऊ नये यासाठी जीन्सला निळा रंग देण्यात आला.जीन्सला निळा रंग देणामागे आणखी एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे भारत. होय, त्या काळात भारताकडून यूरोपला अत्यंत स्वस्त दरात निळेची निर्यात होत असे. सुरूवातीला जीन्सला निळा रंग देण्यात येई मात्र, तो तितका प्रभावी नसे. त्यामुळे इतर रंगाचा विचार केला जात असे. मात्र, भारतातून निर्यात झालेल्या निळेची गुणवत्ता कितीतरी पटीने उत्कृष्ट होती. त्यामुळे भारतीय निळेने अल्पावधीतच जीन्सवर आपले  अधिराज्य गाजवले. जे आजही कायम आहे. आजही सर्वात जास्त प्रमाणात जीन्स ही निळ्याच रंगाची असते. तसेच, निळ्या रंगाच्या जीन्सलाच सर्वाधीक मागणीही असते.