Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पद्मावती बघण्याआधी अल्लाउद्दीन खिलजी बद्दल आधी ह्या गोष्टी नक्की जाणून घ्या !

 
भारताचा इतिहास अनेक कथा आणि प्रसंगांनी भरलेला असा परिपूर्ण आहे . अनेक कथा तर अश्या आहे कि ज्या वाचता वाचता तुम्ही त्यात डुबून देखील जाल. अश्याच एका भारताच्या आधुनिक इतिहासातील एक अविभाज्य पात्र म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी ज्याच्या विवादित आयुष्यावर संजय लीला भन्साळी ह्यांचा पद्मावती चित्रपट लवकरच सिनेमा गृहांमध्ये धडकणार आहे.
बाजीराव-मस्तानी मध्ये प्रेम कथा रंगवणाऱ्या भन्साळींना तोच मोह पद्मावती च्या वेळेस कदाचित आला आणि त्यातच ते अडचणीत आल्याचे चित्र आहे पण अनेकांना ठाऊक नाही कि अल्लाउद्दीन खिलजीचे आयुष्य कसे विवादित होते.
डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होणाऱ्या ह्या चित्रपटा मध्ये रणबीर सिंग हा अल्लाउद्दीन खिलजीची भूमिका बजावत आहे. ज्याच्या ह्या पात्राची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे म्हणून हे अल्लाउद्दीन खिलजी चे काही तथ्य आपल्या समोर प्रस्तुत करत आहोत.


खिलजी वंशाचा संस्थापक आणि अल्लाउद्दीन खिलजीचा सासरा जलालुद्दीन खिलजी च्या हत्येनंतर तो दिल्लीच्या सिंहासनावर बसला होता. १२९६ ते १३१६ असे २० वर्ष त्याने दिल्लीचे तख्त सांभाळले. अल्लाउद्दीन हा उत्तम योद्धा आणि कठोर शासक होता त्याला 'दुसरा सिंकदर' म्हणायचे. सिंकदर-ए-सानी हि पदवी त्याला दिली गेली होती.

खिलजीने गुजरात,मेवाड,मालवा,जालोर,वारंगल अश्या खूप मोठ्या प्रदेशात आपले राज्य विस्तारित केले होते.


राणी पद्मावतीच्या सौंदर्यावर आकर्षित झालेल्या खिलजी बद्दल तत्कालीन लेखक मलिक मुहम्मद ह्याने 'पद्मावत' ह्या काव्यामध्ये विस्तृत वर्णन केले आहे

काय अल्लाउद्दीन खिलजी समलैंगिक होता का ?
अनेक ऐतिहासिक तथ्य हे सांगतात कि अल्लाउद्दीन खिलजी पुरुष आणि स्त्रियांबदल आकर्षण होते. ह्यातीलच एक व्यक्ती म्हणजे मलिक काफूर नावाचा त्याचा सहकारी ज्याच्या प्रेमात खिलजी पडला होता . मालिकला खिलजी ने विकत घेतले होते आणि त्याला आपले गुलाम म्हणून ठेवले होते . खिलजीच्या मुघल हरम मध्ये ७०,००० पुरुष स्त्रिया आणि मुलांचा समावेश होता ज्यांचा तो उपभोग घेत असे.

ह्याच भौतिक मानसिकतेतून अल्लाउद्दीन खिलजी राणी पद्मावती कडे आकर्षित झाला. त्यासाठी त्याने चितौडगड वर हल्ला करण्याचे नियोजन देखील केले. शत्रूच्या हल्ल्यात आपला पाडाव होत आहे हे बघून राणी पद्मावती आणि तिच्या हजारो दासींनी खिलजीचे दास बनण्या ऐवजी जौहर करून आपल्या प्राणांची आहुती दिली.