Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अशिक्षित चोरांनी महिनाभर कट रचून बँकेवर टाकला दरोडा !


आपण बँकेच्या  लॉकरमध्ये काय काय ठेवतो सोने दाग दागिने ठेवतो. काही महत्वाची कागदपत्रे इत्यादी गोष्टी ठेवतो.पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि ते सुरक्षित आहे का नाही? अशी एक अजब घटना मुंबई मध्ये घडली आहे.नवी मुंबईत जुई नगर येथे काही दरोडेखोरांनी भुयार खोदून बँक लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिल्मी स्टाइलने बँकेवर टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे नवी मुंबई पोलीसही चक्रावून गेले आहेत.जुई नगर सेक्टर-११ मध्ये बँक ऑफ बडोदावर दरोडा पडल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने बँक बंद होती. आज सकाळी बँक उघडण्यात आली.


तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. बँकेच्या बाजूला असलेलेल्या दुकानातून भुयार खोदून दरोडेखोरांनी या बँकेत प्रवेश केला. यानंतर तिजोरी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली आहे त्या व्यतिरिक्त बँकेतील २७ लोकर गस कटर च्या सहाय्याने कापून लुटून पसार झाले. दरोडेखोरांनी नेमकी किती रक्कम लंपास केली याची माहिती मिळू शकली नाही. बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानात या भुयाराचे उगमस्थान आढळून आलंय. त्यामुळे या दुकानाचा मालक आणि दुकानातील नोकरांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं.  हे भुयार एका रात्रीत खोदलं गेलं नाही. त्यासाठी अनेक दिवस लागले असतील. पूर्ण प्लॅनिंग करूनच एखाद्या टोळीने हे भुयार खोदलं असावं, असं पोलीस सुत्रांनी सांगितलं. एवढं मोठं भुयार खोदलं जात असताना आसपासच्या परिसरातील लोकांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? यावर पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.