Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ओव्याचे फायदे - जे तुमच्या न सुटणाऱ्या समस्या चुटकीत दूर करतील

 

ओवा...
घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.


१.दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.
२.सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.
३. सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो.
४. पोट दुखत असल्यास अथवा अपचनाचा त्रास जाणवल्यास ओव्याचे पाणी प्या.
५. ओव्याचे पाणी नियमित घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.
६. हृदयासंबंधित अनेक आजारांवर फायदेशीर आहे ओव्याचे पाणी.
७. तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास ओव्याच्या पाण्यामध्ये एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे.
८. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.
९. पोटात जंतू झाल्यास ओव्याच्या पाण्यात एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे. जंताचा त्रास दूर होईल.
१०. निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.

ह्याशिवाय रोज ओव्याचा चहा पिल्यास तो उत्तम अँटी ऑक्सिडंट आहे. योग शास्त्रामध्ये पण शरीरातील अनेक ऊर्जा केंद्रांना ओव्याच्या वापराने फायदा होतो.  आणि म्हणूनच ओवा हा मोठ्या प्रमाणात आयुर्वेदासह अनेक वैद्यकीय शाखांमध्ये वापरला जात आहे .