Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

सावधान: सोयाबीन तेलाचे हे घातक परिणाम वाचून तुम्हाला धक्का बसेल
खरे म्हणजे सोयाबीन तेल हे अतिशय हानीकारक खाद्य तेल आहे ज्याच्या सेवनाने आपले शरीर अनेक अनेक दुर्धर आजारांचे घर बनते.

१. सोयाबीन मुळे स्थूलपणा आणि डायबेटीस होण्याचा धोका असतो

आज अमेरिकेसारख्या देशात जिथे सोयाबीन चा वापर मोठ्या प्रमाणावर खाद्य तेल म्हणून होतो तिथे ३ पैकी २ जण स्थूलपणा (Obesity) मुले ग्रस्त आहे. डायबेटीस (Diabetics) होण्यामागे स्थूलपणा हे सगळ्यात मोठे कारण असते.२. सोयाबीन च्या सेवनाने जळजळ अधिक प्रमाणात होते 

सोयाबीन च्या अधिक सेवनाने ओमेगा ६ आणि ओमेगा ३ चे संतुलन प्रमाण बिघडते ज्यामुळे जळजळ (Inflammation) होते आणि अनेक आजार आपल्याला होतात.

३. सोयाबीन मुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारात वाढ होते

सोयाबीन मुळे oxidized fats ची निर्मिती होते ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारात उद्भवतात

४. सोयाबीन तेल निर्मिती करताना अनेक हानिकारक घटक वापरले जातात

सोयाबीन खाद्य तेल निमिर्ती प्रक्रिया अनेक हानिकारक घटक वापरून पूर्ण होते. ब्लिच, हेक्झेन यासारखे अनेक केमिकल वापरले जातात.

५.  सोयाबीन मुळे आपल्या शरीरातील Fatty Acids चे संतुलन बिघडते

शरीरातील ओमेगा ६ आणि ओमेगा ३ चे संतुलन बिघडल्यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार आपणास होऊ शकतात. तसेच आपल्या शरीरातीलपेशींची रचना सुद्धा बदलू शकते.

या सगळ्या कारणामुळे सोयाबीन खाद्य तेल जर आपल्या आहारात असेल तर ते खाणे कमी अथवा बंद करणे आपल्या हिताचे आहे. नैसर्गिक प्रक्रियेने बनवलेले लाकडी घाण्याचे खाद्य तेल हा यावरील आरोग्यदायी पर्याय असून त्यामुळे आपल्या देशाचे परकीय चलन सुद्धा वाचेल.   तसेच पशुखाद्य असलेल्या सोयाबीन चा वापर मानव जन्मात आपण करण्यापासून स्वतःची सुटका करून घ्याल.