Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

३५० वर्ष जुना शिवरायांनी बनवलेला पूल सुस्थितीत, आपला पूल १० वर्षात वाहून गेला !

 
प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचा दैदिप्यमान साक्षीदार ! महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान .. ह्याच प्रतापगडावर मग्रूर अफझल्याचा वध हिंदवी शिवराज्य प्रणेते छत्रपती शिवरायांनी केला .. तिथेच प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक छोटेसे गाव आहे. नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. त्याकाळी पावसाळ्यानंतर ४-५ महिने नदी पार करण्यासाठी खूप धडपड करावी लागत असल्याने जनतेची अडचण लक्ष्यात घेऊन शिवरायांनी तिथे एक पूल बांधण्याचा आदेश दिला काही महिन्यातच त्याचे बांधकाम पूर्ण झाले .
साधारण ८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा असा अंदाज आहे.
कोयना नदी ओलांडण्या साठी ५२ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद असा हा भक्कम दगडी पुल बांधलेला आहे. पुलाला असणाऱ्या पाच आधारांवर पुलाच्या त्याच्या चार कमानी तयार झाल्या आहेत. त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो हे विशेष. त्याकाळात पण वास्तूविशारद शास्त्र किती प्रगत आणि शास्त्र शुद्ध होते ह्याचेच हे उत्तम उदाहरण. पुलाचे सारेच बांधकाम फक्त चुन्यात केलेले आहे.

सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा १ फूटी दगडी कठडा आहे.

आपण ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांचे १०० वर्षे झाली म्हणुन कौतुक करतो. या पुलाला ३५० बर्षे होऊनही अद्याप एकही तडा गेला नाही अथवा दगडही निसटला नाही. .....