Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पुरोगामी कोल्हापूर मध्ये नरबळी प्रकार उघड !

 

कोल्हापूर मधील शिरसी तालुका शिराळा येथे काळभैरव मंदिरात एक छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला आहे. मंदिरातील चक्रभैरव मूर्तीच्या अगदी समोर हा मृतदेह पडलेल्या अवस्थेत दिसून आला असून, या मृतदेहाजवळून अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले हेल्याचे दिसून आले . हा प्रकार नरबळीचाच असावा, अशी शंका आणि अंदाज गावकरी तसेच पोलीस व्यक्त करत आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. हे भयावह चित्र बघून सर्वत्र हाहाकार उडाला आहे.

मयत व्यक्ती  ४० ते ४२ वर्षे असल्याचा अंदाज आहे. शिराळा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौर्याची परिसिमा, माणुसकीला काळिमा हे शब्दही अपुरे पडतील, अशा पद्धतीने या व्यक्तीचा खून करण्यात आला आहे. हे मंदिर शिरसी -शिवरवाडी सीमेवर आहे. ह्या प्रकरणाची माहिती मिळताच आणि गंभीरता बघता पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
ह्या मंदिराचा परिसर तसा निर्जन आणि डोंगरमाथ्याचा आहे, त्यामुळे हे मंदिर तसे दुर्लक्षित आणि कोणीही न जाणारे आहे. सदर मंदिरात जायला पक्का रस्ता देखील नाही. शुक्रवारी मध्यरात्री येथे हि घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मंदिराला विश्वस्त मंडळ देखील आहे आणि तिथे सभा मंडपाचे काम देखील चालू आहे. शुक्रवारी काम संपवून ५ वाजता मजूर निघून गेले आणि शनिवारी सकाळी मंदिरात येता त्यांना मृतदेह दिसला तसे लिंबू,कुंकू,कापूर,टाचण्या, काळ्या बाहुल्या असे सामान देखील पडलेले दिसले.


तात्पुरती खबरदारी म्हणून हे मंदिर सध्या बंद करण्यात आले असून पोलीस प्रशासनाने गुन्ह्याची उकल होण्यासाठी ह्या मंदिराचा ताबा घेतला आहे. अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास चालू आहे