Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

व्हिडीओ : वडिलांसोबत बंदूक घेयला गेला आणि चुकून उडवले दुकानदारालाच !


अमेरिकेमध्ये बंदूक बाळगण्याचे खूप मोठे प्रमाण आहे ... ३० कोटी लोकसंख्या असलेल्या ह्या प्रगत देशात दरवर्षी ५० लाख शस्त्र विकले जातात पण ह्या मागे प्रमुख कारण हे गुन्हेगारी वृत्ती नसून अमेरिकेमध्ये लाखो लोकांना शिकारीचा छंद आहे, आकाराने मोठा असलेल्या अमेरिकेमध्ये सर्वदूर शेती केली जाते. जिथे लोकवस्ती अत्यंत विरळ असते त्या भागात सुरक्षेच्या कारणाने शस्त्र बाळगले जातात आणि ह्याच मानसिकते मधून तिथे लहान मुलांच्या हातात पण हि शस्त्र येतात ...

असाच एक प्रसंग कॅन्सस नावाच्या भागामध्ये घडला जिथे मेसन विलियम नावाच्या शस्त्र विक्रेत्याच्या दुकानात एक माणूस त्याच्या ७ वर्षीय मुलासोबत बंदूक खरेदी करायला गेला ... दुकानदार त्या गिर्हाईकाला बंदुकीचे प्रात्यक्षिक देत होता पण तेवढ्यात मागे असलेल्या ७ वर्षीय मुलाने बंदूक हातात घेतली, कोणाचे त्याच्या कडे लक्ष नव्हते, त्याला वाटले कि ती लोडेड नाही आहे, पण त्याने ती चालवली ...

१ इंचाने वाचले वडिलांचे डोके !

मुलाने चालवलेली गोळी वडिलांच्या डोक्यापासून फक्त १ इंच अंतराने दूर होती पण ती थेट घुसली ती दुकानदाराच्या छाती मध्ये आणि १-२ मिनिट मृत्यशी झुंज देत दुकानदाराचा ह्यात दुर्दैवी अंत झाला !


हि घटना घडल्यावर मुलाच्या वडिलांनी लगेच ९११ ह्या सेवेवर फोन करून झालेली सर्व घटना सांगितली. वैद्यकीय सेवा आणि पोलीस तात्काळ दाखल झाले. सदर घटना दुर्दैवी असून ह्या कायदा आपले काम करेल .. सीसीटीव्हीचे खालील फुटेज पोलिसांनी घेतले असून ते पुढील चौकशी करत आहे