Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हिंदू महासभेने का केले दिल्लीमधील आपच्या केजरीवाल सरकारचे अभिनंदन ?दिल्ली मधील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) च्या सरकारने नुकताच एक निर्णय जाहीर केला. दिल्ली मधील प्रत्येक विधानसभा मतदार संघातील १,००० ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. या योजने अंतर्गत उत्तर भारतातील हरिद्वार, मथुरा, बद्रीनाथ आणि केदारनाथ या चार तीर्थ क्षेत्रांची यात्रा केली जाणार आहे. 

अखिल भारतीय हिंदू महासभेने या निर्णयाचे जोरदार स्वागत जातात अरविंद केजरीवाल यांचे कौतुक तर केलेच आहे पण प्रमुख स्वामी चक्रपाणी यांनी केजरीवाल याना देव उज्वल भविष्य आणि दीर्घायु देवो अशी प्रार्थना सुद्धा केली आहे. तसेच हिंदुत्वाचा गवगवा करणाऱ्या भाजपाने दिल्लीमधील आपच्या केजरीवाल सरकार कडून काही तरी शिकावे असा सणसणीत टोला सुद्धा लगावला आहे. 

केजरीवाल यांनी दिल्ली पर्यटन मंत्रालयाला तात्काळ या योजनेची रूपरेषा बनविण्याचे आदेश दिले असून २०१८ मधील मकर संक्रांति पासून यात्रेची सुरुवात केली आजही असा मानस बोलून दाखविला आहे. निश्चितच या योजनेमुळे अनेक हिंदू गरजू भाविकांना आपले तीर्थयात्रेचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. तीर्थ यात्रेसाठी संपूर्ण खर्च दिल्ली सरकार करणार असून वेगळ्या बसेस ची सुद्धा व्यवस्था केली जाणार आहे. तसेच भाविकांना यात्रेदरम्यान भोजन आणि इतर गरजेच्या सेवा पुरविल्या जाणार आहे. मोफत पाणी आणि अर्ध्या दरात वीज दिल्यांनतर मोफत तीर्थयात्रा योजनेमुळे दिल्लीमधील लोक निश्चितच समाधान व्यक्त करत आहे.   


आगामी काळात भाजपा सरकार सुद्धा आप च्या पाऊलावर पाऊल ठेवून राज्य सरकारांमार्फत इतर राज्यात हि योजना सुरु करते का कि नाही यावर अनेक लोकांचे लक्ष असेल.