Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

एका मुलीला शाळेत जाता यावे म्हणून जपान सरकारने चालवली ट्रेन !


आपल्या देशात खेड्यापाड्यांमध्ये शालेय विद्यार्थी अनेक मैलाचा प्रवास करून,नद्या नाले पार करून शाळेत जात असतात हे आपण पाहतो,ऐकतो पण जपान सारख्या आधुनिक देशात पण प्रचंड बर्फ वृष्टी पडणाऱ्या भागात विरळ लोकसंख्येमुळे हि समस्या निर्माण होत असते ..
जपान मध्ये कामी-शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन जवळ जवळ बंदच आहे असं म्हणू शकतो. कारण ही जागा जपानमध्ये खूप दूरच्या भागात असल्याने इथे ये जा करणारे प्रवासी तसे कमीच, त्यामुळे जपान रेल्वेज या संपूर्ण रेल्वे लाईनला बंद करणार होती. पण तेवढ्यात त्यांना समजलं की 'काना हाराडा' नावाची एक लहान मुलगी या ट्रेनचा वापर रोज शाळेत जाण्यासाठी करते. साहजिक आपल्याला एका प्रवाश्यामुळे काही फरक पडणार नाही. पण रेल्वे लाईन बंद झाल्याने मुलीची शाळा बंद पडेल हे जेव्हा जपान रेल्वेजच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो कौतुक करण्याजोगा होता. त्यांनी असं ठरवलं की जोपर्यंत या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही रेल्वे बंद होणार नाही. आणि तेव्हा पासून केवळ एक प्रवासी असलेली ही ट्रेन धावत राहिली.

एवढ्यावर न थांबता जपान रेल्वेजने मुलीच्या शाळेच्या वेळेनुसार रेल्वेचं टाईमटेबल तयार केलं. शाळेच्या वेळेनुसार ट्रेनची वेळ बदलत असायची. २०१६ साली काना हाराडाचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं आणि तेव्हा पासून ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली.
जपानी माणूस हा समाज जीवनामध्ये त्यांच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर खूप जास्त संवेदनशील आहे ... जर तुम्ही समाजातील सर्व घटकांना सामावून तुमचा देश पुढे नेत असाल तरच देशाची प्रगती होऊ शकते असे जपानी लोकांचे मत आहे आणि ह्यासाठी वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन पण जपान आपले विचार जपते ... हि घटना ह्याचेच उदाहरण म्हणायला हरकत नाही .. एखाद्या देशाच्या सरकारने केवळ एका मुलीच्या शिक्षणाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी ही गोष्ट खरंच महान आहे. यासाठी जपानला मानाचा मुजरा !!