Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का गांजाचे पीक घेऊ द्या म्हणून केला ह्या शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज ?

 
एका गरीब शेतकऱ्याने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना  पत्र लिहिले आहे . त्या पत्राचा विषय पण खूप अजब आहे. या पत्रामध्ये शेतकऱ्याने जिल्हाधिकारी साहेबांना विनंती अर्ज केला आहे कि त्याला गांजाची शेती करण्यास परवानगी द्यावी . इतकी दयनीय अवस्था झाली आहे शेतकऱ्याची . हलाखीत जीवन जगावे लागत आहे . शेतीमालाला भाव राहिलेला नाही . शेतकरी जेव्हढ्याच पीक घेतो तेवढेसुद्धा उत्पन्न मिळत नाही त्याला . अशा परिस्थितीत शेतकऱ्याने काय केले पाहिजे ? त्यामुळे या परिस्थितीला कंटाळून एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी साहेबांना पत्र लिहिले आहे. या पत्रात या शेतकऱ्याने चक्क गांजा ची लागवड करण्याची परवानगीसाठी विनंती अर्ज लिहिला आहे.या पत्राचा विषय आहे कि सध्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे गांजाची शेती करण्यास परवानगी द्यावी . पुढे शेतकरी असं लिहितो कि , विषयास अनुसरून मी लिहितो कि मी  हिस्तनाबाद जिल्हा शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी आहे . माझी दीड एकर स्वतःची जमीन आहे . त्यात मी सध्या सोयाबीन , तूर, हरभरा हे पीक घेत आहे. परंतु या शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतीमालाला भाव नसल्यामुळे हे पिके अजिबात परवडत नाही आहेत .

त्यामुळे मी जर माझ्या दीड एकर जमिनीमध्ये गांजाची लागवड केली तर त्याला सध्या खूप भाव असल्यामुळे गांजाची शेती करणे हे नफ्यात  राहू शकते . म्हणून माननीय जिल्हाधिकारीसाहेबांनी मला माझ्या शेतामध्ये गांजा लागवड करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मी नम्र विनंती करत आहे .

आज एक शेतकऱ्याने पत्र लिहिले आहे उद्या शेकडो लिहितील पर्वा हजारो लिहतील मग भविष्यात काय लोकांनी तूर डाळ च्या ऐवजी गांजा फुकायचा का ?

इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर का यावी ? जर शेतकऱ्यावर अशी वेळ येत आहे तर मग या परिस्थितीला कोण जवाबदार आहे ? सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कानाडोळा न करता त्या समस्यांवर तोडगा काढला पाहिजे . शेतकरी हा देशाचा कणा आहे . त्यामुळे शेतकऱ्यावरचा हा अन्याय थांबवा आणि त्याला न्याय द्या .