Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कोपर्डी नराधम दोषीच !! पण अजून फाशी नाही ...

 

कोपर्डी चे आरोपी दोषी सिद्ध २१ तारखेला शिक्षा सुनावली जाणार  !!

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. या खटल्यातील अंतिम युक्‍तिवाद पूर्ण झाला असून जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता निकालाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र, आरोपी दोषी असल्याचा निर्णय दिल्यास त्यांना आजच शिक्षा सुनावली जाईल की नाही, याबाबत संभ्रम आहे.

नक्की काय होते प्रकरण ?


13 जुलै 2016 रोजी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे  नववीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर 15 जुलै 2016 रोजी या गावातील आरोपी जितेंद्र बाबूलाल शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर 16 जुलै रोजी संतोष गोरख भवाळ, नितीन गोपीनाथ भैलुमे या दोघांना अटक झाली होती.


31 जणांच्या साक्ष घेण्यात आल्या होत्या 

या खटल्यात सरकारी पक्षाकडून 31 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

राज्यभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात निघाले होते   मराठा मूक मोर्चे

कोपर्डी घटनेच्या संतापाची लाट राज्यभर पसरली. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोर्चे काढण्यात आले.नासिक,पुणे मुंबई सगळीकडे लाखोंच्या संख्येने अतिशय शांततेत मूक मोर्चे काढले गेले होते . 
निकालादरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे 

या खटल्यासाठी न्यायालयाच्या आवारात दोन स्ट्रायकिंग फोर्स व 70 पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त असणार आहे. घटना घडलेल्या कोपर्डी गावात 50 पोलिस कर्मचारी व स्टायकिंग फोर्स असणार असून, जिल्ह्यात कायदा व व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली आहे.त्याचे कारण मात्र इतकेच कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये.


सुट्टीच्या दिवशीही युक्तिवाद चालू होता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तिवाद केला. जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असूनही खटल्याचे कामकाज पार पडले. तीन दिवसीय युक्तिवादात निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला.या युक्तिवादावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

निकाल एेकण्यासाठी ध्वनीवर्धकची  व्यवस्था करण्यात आली आहे 

या खटल्याचा निकाल एेकण्यासाठी न्यायालयात गर्दी होणार असल्याचे गृहित धरून न्यायालयाकडून निकाल ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या आवारात दोन ध्वनीवर्धक लावण्यात आले आहेत.त्यामुळे कोर्टाच्या आवारातील जनतेला निकाल स्पष्ट ऐकू येईल.