Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

इराक-इराण मध्ये झाला १२ वर्षातील सर्वात मोठा भूकंप !!

इराक व इराण येथे आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. इराक व इराण येथे कमी तीव्रतेचे भूकंप होत असतात . पण काल जो भूकंप झाला तो इराक व इराण येथे १२ वर्षातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे .

इराक इराण मध्ये झाला १२ वर्षातील सर्वात मोठा भूकंपइराक आणि इराणमधील मृत्यूंची संख्या ४५० च्या पुढे गेली आहे आणि ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत . इराणमध्ये तर २० गाव समूळ नष्ट झाली आहेत . भूकंप थांबल्यानंतर पण पुढील १० तासात १०० झटके जाणवले आहेत . इराकच्या बगदाद आणि दारुबंदीखान पर्यंत त्याचा प्रभाव जाणवला .

भूकंपाचे झटके इराण इराणच्या सरहद्दीवर साधारण रात्री ९.२० मिनिटांनी जाणवले . सरहद्दीपासून ३०किमी वर त्याचे केंद्र होत . त्या भूकंपाची तीव्रता ७.३ इतकी होती . त्याची तीव्रताइतकी होती कि धरतीच्या गर्भात ३३. ९ किमी इतका आतपर्यंत हादरे बसले . भूकंपाचा प्रभाव हा ३५० किमी पर्यंत होता . इराक इराणमधील गेल्या १२ वर्षातील सर्वात मोठा भूकंप मानला जात आहे . त्याव्यतिरिक्त इराणचे जवळपास २० गाव पूर्णपणे नष्ट झाली आहेत . टीव्हीवर सांगितलेल्या बातमीनुसार ७.३ तीव्रतेच्या भूकंपानंतर आत्तापर्यंत जवळ जवळ १९३ झटके जाणवले आहेत . भूकंपासून इराणचे १४ प्रांत प्रभावित आहे .

इराक इराण मध्ये झाला १२ वर्षातील सर्वात मोठा भूकंप


आत्तापर्यंतच्या मिळालेल्या बातमीनुसार इराणमध्ये आत्तापर्यंत ४४६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ७,३७० लोक जखमी झाले आहेत .
तिकडे इराकमध्ये सरहद्दीच्या आसपास असणाऱ्या भागांमध्ये ८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास ५३५ लोक जखमी झाली आहेत .
भूकंपासून ७०,००० पीडित झाले आहेत . तेवढ्याच संख्येने राहत शिवीर ची गरज लागणार आहे . ५० आपत्कालीन टीम तयार आहेत . तुर्कीने सुद्धा भूकंप पीडितांसाठी ४००० टेन्ट आणि ७००० चादरी पाठवल्या आहेत . हजारोंच्या संख्येने असणाऱ्या लोकांना शिवीरमध्य ठेवलं गेलं आहे . तरीसुद्धा बरेचसे लोक अजून आभाळाच्या खाली आहेत .

इराक इराण मध्ये झाला १२ वर्षातील सर्वात मोठा भूकंप


पृथ्वीच्या गर्भात जेथे प्लेट्स आदळतात त्याला फॉल्टलाईन असे म्हणतात. इराक इराणचा सीमावर्ती भाग याच फॉल्टलाईन वर आहे . या फॉल्टलाईनमधील हालचालींमुळे हा भकम्प झाला असे शास्त्रन्यांचे मत आहे .