Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बापरे .. तुमच्या आवडत्या मोबाईल फोनचा स्फोट झाला CCTV मध्ये कैद !

मोबाईल म्हणजे आपला दुसरा आत्माच! हे उपकरण आजकाल जवळ नसेल तर मनुष्य श्वास पण नाही घेऊ शकत. एक काय २-२ मोबाईल जवळ बाळगणारे लोक आहे आपल्याकडे. विवो,ओप्पो,वन प्लस अश्या चिनी आणि सॅमसंग सारख्या कोरियन कंपनीने भारताचे मार्केट व्याप्त केले आहे.
मोबाईल स्फोट होण्याच्या अनेक घटना ऐकण्यात आल्या आहे पण हि पहिली घटना आहे जी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. हि घटना आहे पूर्व चीन मधील एका ऑफिस मधली. ह्या घटनेत मोबाईल फोन हा फक्त एका टेबलावर ठेवलेला आहे पण अचानक तो ब्लास्ट होतो आणि संपूर्ण ऑफिस धुराने भरून जाते. शॅडोन्ग जिल्ह्यातील वेईफंग गावात हि घटना २० नोव्हेंबर २०१७ ला घडली आहे.  ह्या मोबाईलची कंपनी हि चिनीचं असून अजून ती ओप्पो अथवा विवो प्रमाणे भारतात आली नाही आहे पण कदाचित आता लवकर भारतात येउ शकते.

का होतो मोबाईलचा स्फोट ?
मोबाईल स्फोट होण्याचे प्रमुख कारण बॅटरीचे तापमान वाढणे हेच आहे ते खालील काही कारणांनी वाढू शकते
१. वायफाय वर खूप ऍप्स चालू असतील तर प्रोसेसर गरम होतो त्यात मोबाईल चार्ज पण होत असेल तर स्फोट होऊ शकतो. ह्या साठी चार्जिंग करत गेम्स खेळू नका.
२. बॅटरी लीक अथवा डॅमेज झाली असेल तर.
३. एखाद्या खूप उष्ण भागाजवळ मोबाईल ठेवला असेल तर अथवा तीष्ण सूर्यप्रकाशा मुळे.

काळजी काय घ्यावी ..
मोबाईल सारखा सारखा गरम होत असेल तर बॅटरी चेक करा.
मोबाईलचा चार्ज लगेच डाऊन होत असेल तर तो तसाच वापरू नका बॅटरी बदला.
डुप्लिकेट चार्जर वापरू नका . ह्या घटनेचा व्हिडीओ खाली बघा ..