Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

फलन्दाज बाद झाला पण समजलेच नाही - व्हॉटस-अप व्हायरल व्हिडीओ चे वास्तव !

 
सध्या व्हॉटसऍप वर व्हिडीओ खूपच जास्त व्हायरल होत आहे ... तो व्हिडीओ आहे एका क्रिकेटच्या सामन्याचा, ज्या मध्ये एक बॉल टाकल्यावर फलन्दाज तो सोडून देतो आणि अंपायर त्या बॅट्समनला आउट देतो ! हा व्हिडीओ खूप जास्त व्हायरल झाला असून त्या बद्दल खूप काही तर्क वितर्क सर्वत्र लावले जात आहे पण कोणालाही ह्या गोष्टीची उकल नाही होऊ शकली ..

आधी तुम्ही हा व्हिडीओ बघा आणि तुम्हाला काय वाटते त्या बद्दल तुमचे मत व्यक्त कराकाय असेल ह्या मागचे तथ्य ? कसा झाला असेल तो फलन्दाज बाद ? 
कोणी म्हणते कि मागच्या ओव्हर मध्ये तो हिट-विकेट झालेला पण अंपायरचे ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष झाले आणि पुढच्या वेळेस तो फलन्दाज जेव्हा बॅटिंग करायला आला तेव्हा मात्र त्याला बाद दिले गेले .. पण नाही हे चुकीचे आहे !

 

मग तो टाईम-आउटच्या निर्णया नुसार बाद झाला का ? तर नाही हे पण उत्तर नाही ... मग कश्याने झाला असेल बर हा फलन्दाज आउट ? हे आहे ह्या फलंदाजाला बाद देण्याचे खरे कारण !

हा सामना २००७ साली खेळण्यात आला होता जो एक चॅरिटी सामना होता. ह्या सामन्याचा उद्देश मदतीसाठी पैसा जमा करणे हे होते. ह्या सामन्या मध्ये खेळणारे सर्व खेळाडू हे काही क्रिकेट खेळू शकणारे नव्हते ते सर्व हौशी प्रतिष्ठित लोक होते. म्हणून हा सामना रंजक बनवायला एक नवीन नियम बनवला गेला होता !

जर कोणी फलंदाज खेळता येण्याजोगे २ चेंडू सोडून देत असेल तर अंपायर त्या फलंदाजाला बाद ठरवू शकतो 

 .... आणि नेमके हेच घडले ... २ हुन जास्त चेंडू सोडणाऱ्या फलंदाजाला बाद ठरवले गेले आणि तो तंबूत परतला .. तर हि आहे हि सामन्याची सत्य कथा ... आशा करतो आमचा हा रिसर्च तुम्हाला आवड्ला असेल