Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा धर्मेंद्रचे साम्राज्य ४ मुली, २ बायका आणि ५५० कोटीची मालमत्ता अजून बरेच काही !


 
तुम्ही धर्मेंद्रला ओळखतच असाल कोणी नाही ओळखत त्यांना. सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात . तसे तर त्यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत . पण त्यांना खरी ओळख हि शोले या चित्रपटात वीरूने मिळवून दिली . शोले हा चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरला होता . त्यानंतर त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट केले .  धर्मेंद्र हे एक फक्त उत्तम कलाकार नाही आहे तर ते एक उत्तम प्रोड्युसर पण आहे . त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस पण सुरु केला आहे आणि त्याचा नाव आहे विजयता फिल्म्स  प्रोडक्शन हाऊस. ते एक उत्तम राजकीय नेते देखील आहेत . तर आज आपण जाणून घेणार घेणार आहोत त्यांच्याविषयी......
धर्मेद्र ह्यांची मालमत्ता ५५० कोटीची एक अंदाज आहे  !

Dharmendra Deol


धर्मेंद्र यांचा संपूर्ण नाव धर्मेंद्र सिंग देओल आहे . त्यांचा जन्म पंजाबमधील सहनेवाल या छोट्याशा गावात झाला होता . त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण लुधियानातील गव्हर्मेंट सेक स्कूलमधून पूर्ण केले . फगवारा मधील रामगारहीया कॉलेजमधून  त्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले . त्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीचे वेध लागले . मग त्यांनी त्यांची पावले चित्रपटसृष्टीकडे वळवली .

Dharmendra Deol


जुहूमध्ये त्यांचा स्वतःचा खूप मोठा घर आहे . अजून पण त्यांच्या घरासमोर चाहत्यांच्या रांगा लागलेल्या असतात . त्यांचे खानदानी घर लुधियानामध्ये अजूनही आहे . धर्मेन्द्रजींना गाड्यांचा खूप शौक आहे . धर्मेन्द्रजींनकडे एक मर्सिडीज बेंझ sl ५००,रेन्ज रोव्हर इत्यादी अनेक महागड्या गाड्या आहेत .


धर्मेन्द्रजींच्या वडीलांचे नाव केवल कृष्णसिंग देओल आहे . ते त्यांच्या गावातील शाळेचे मुख्यध्यापक होते . त्यांच्या आईचे नाव सतवंत कौर आहे आणि त्याच्या भावाचे नाव अजित देओल आहे . धर्मेन्द्रजींच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर होते . १९५४ साली धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे लग्न झाले होते . त्यांचा संसार फार काळ काही टिकला नाही त्यामुळे त्यांनी घटस्फोट घेतला . त्यांनतर शोलेच्या शूटींदरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात सूत जुळून आले . मग त्यानंतर १९८० साली धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा विवाह झाला .


vijeta deol and ajeeta deol
धर्मेन्द्रजींना पहिल्या पत्नीपासून विजीता देओल आणि अजिता देओल या दोन मुली आहेत आणि सनी व बॉबी हे दोन मुलं आहेत  इशा देओल आणि अहाना देओल या दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या मुली आहेत .


Sunny Deol Family

सनी देओलच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे . ती एक उत्तम गृहिणी आहे . सनीला करण आणि राजवीर नावाची दोन मुले आहेत.


Bobby Deol Family

बॉबी देओलच्या मुलाचे नाव आर्यन  आणि धरम  देओल आहे .बॉबी देओलच्या पत्नीचे नाव तान्या देओल आहे . तीसुद्धा एक उत्तम गृहिणी आहे .इशा देओल आणि अहाना देओल. इशा देओलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून अहाना मात्र अलिप्त जीवन जगते.  दोघींचे लग्न झाले आहे. ईशाचे लग्न भारत तख्तानी म्हणून एका व्यावसायिकाशी झाले आहे. राध्या नावाच्या एका गोंडस मुलीला तिने नुकताच जन्म दिला आहे. अहानाचे लग्न वैभव वोहरा म्हणून व्यक्तीशी २०१४ मध्ये झाले असून डेरियन म्हणून तिला एक मुलगा देखील आहे.
धर्मेंद्राने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत तो राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले.