Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

गावकऱ्यांनी दिला उचलायला नकार डॉक्टरने १० किमी उचलून केला गर्भवती महिलेचा उपचार !

 

उडीसा ह्या भारतातील मागास राज्यामध्ये माणुसकीने परत जन्म घेतला डॉ ओंकार होतांच्या ज्यांनी प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होणाऱ्या एका महिलेला खाटेवर टाकून आणि खांद्यावर उचलून एका माणसाच्या मदतीने तब्बल १० कि.मी. चा प्रवास करून हॉस्पिटल मध्ये आणले.


सुभामा मार्से नावाच्या आदिवासी महिलेची प्रसूती झाल्यावर तिला प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला आणि तिला वैद्यकीय सेवा केंद्रामध्ये नेण्याची तातडीची गरज होती जी १० किलोमीटर लांब पापुलूर मधेच होती. 
हि घटना आहे ३१ ऑकटोबरची जेव्हा मार्से गावातून तातडीच्या मदतीचा कॉल डॉक्टर होता ह्यांना आला.

माओइस्ट नक्षल भागात असलेल्या ह्या भागामध्ये त्या महिलेला १० किमी नेण्यास कोणीहि गावकरी तयार होईना फक्त महिलेचा नवरा काय तो तयार झाला पण त्याचे नातेवाईक देखील पुढे येयला धजेनात शेवट डॉक्टर होतांनीच वेळेचे गांभीर्य ओळखून एका खाटेला लाकडाच्या ओंडक्यावर डोलिसारखे बांधून पापुलूरच्या दिशेने कूच केली आणि ३१ वर्षीय डॉक्टर ओंकार होता आणि महिलेच्या पतीने तिला अखेर २ तासात वैद्यकीय सेवा केंद्रात दाखल केले. महिला आता सुखरूप आहे.

 

का काही पहिला प्रसंग नाही !
डॉक्टर होता ह्यांनी ह्याआधी असे अनेकांना वैद्यकीय सुविधा दिल्याचे आजूबाजूचे अनेक नागरिक सांगतात. त्यांच्या ह्या कार्याचे कौतुक पत्रकार परिषद घेऊन उडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक ह्यांनी केले आहे. क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण ह्याने केलेल्या ट्विट नंतर त्यांचे हे कार्य प्रकाशात आले.