Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

नाहीतर DSK ना अटक ?


आज कोर्टामध्ये पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती डीएसके ह्यांना कोर्टाने ५० कोटी रुपये जमा करण्याचे सुनावले आहे. तत्काळ ५० कोटी जमा न केल्यास डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ५० कोटीची रक्कम नेमकी कधी भरणार याविषयी हायकोर्टात सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणं डीएसकेंना अनिवार्य केले होते . हि जी येणारी रक्कम आहे त्यातून कोर्ट गुंतवणूक दाराची दिलेली रक्कम चुकती करेल, डीएसकेची जी मालमत्ता त्वरित विकण्याजोगी आहे त्याची यादी देखील माननीय न्यायालयाने मागितली आहे.


डीएसकेंना आज हायकोर्टाकडून १ तासाची मुदत!
मुंबई उच्च न्यायालायने बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना फटकारत, केवळ एक तासाची मुदत दुपारी ४ च्या सुमारास दिली आहे. बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंना दिला.
 
प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी हे सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. गेली ४० वर्षे मेहतीने उभा केलेला त्यांचा व्यवसाय गेले २ वर्ष झाले आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. 'घराला घरपण देणारी माणसे' हि ओळ हाताशी धरून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांचे भांडवल सोबत घेत डीएसके गेली २० वर्षांपासून मोठ्या झेप घेत आहे पण २०१७ मध्ये त्यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहेत. त्यांच्या कडे पैसे दिलेल्या लोकांना ते त्यांचे पैसे आणि व्याज गेले काही महिने देउ नाही शकले आहेत. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी ह्या प्रकरणा मध्ये एक हमीदाराची भूमिका निभावली होती ज्यामुळे डीएसके ह्यांच्या ठेवीदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते . ते नक्कीच ह्यातून बाहेर पडतील ह्यात शंका नाही असे अनेकांचे मत आहे आणि होते. मराठी व्यावसायिकाच्या मदतीला राजकीय चौकाटीतुन बाहेर पडून मदत करण्याच्या राजसाहेबांच्या ह्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक देखील झाले होते .