Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

गुटखा किंगच्या मुलींनी नाचून काढली त्याची अंतयात्रा !

गुटखा हि अशी गोष्ट आहे जी खाणे आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे हे आपण जाणतोच, आपल्याकडे त्यावर बंदी देखील असल्याचे ऐकिवात आहे पण तरीही ते खाणाऱ्यांची संख्या काही दिवसेंदिवस कमी न होता वाढत आहे आणि ह्यातूनच तयार होत आहे राज्याराज्यांत गुटका किंग !
हे गुटका किंग आपली उत्पादने विकून करोडोची माया जमा करून नाव लौकिक मिळवतात असाच एक गुटका किंग म्हणे नोएडाचे हरिभाई लालवाणी .. त्यांचे नुकतेच दुःख निधन झाले  ज्याप्रमाणे कुठल्याही ठिकाणी अश्या कठीण प्रसंगी भावुक वातावरण असते आणि सर्व आप्तस्वकीय हे दुःखात लोटले जातात त्याच अपेक्षेने सर्व लोक त्यांच्या अंत यात्रेमध्ये सामील होण्यासाठी गेले ...
४ मुली असलेल्या हरीभाईंच्या घरी तेव्हा मात्र वेगळेच वातावरण होते, त्यांच्या घरात दुःखाचा तर लवलेश देखील नव्हता उलट अरबो रुपये त्यांनी ज्या मुलींसाठी सोडले त्यांनी ढोल-ताशे लावत वाजत गाजत मिरवणूक काढायचे ठरवले होते आणि त्यांनी ती मिरवणूक काढली देखील ...
ह्या सर्व प्रकाराने अचंबित झालेल्या लोकांनी जेव्हा त्यांच्या मुलीला दीप्ती लालवाणी  ह्यांना ह्या बद्दल विचारणा केली तर मोठ्या मुलीने सांगितले कि ते नेहमी आम्हाला सांगायचे कि
जेव्हा पण मी मरेल तेव्हा माझे वाजत गाजतच अंत्ययात्रा काढा 
आणि तुम्ही आनंदी वातावरणामध्ये मला निरोप द्या
...
मी माझे आयुष्य खूप मजेत घालवले आहे तुम्ही माझ्यासाठी दुःख नका करू असे ह्या गुटका किंगचे म्हणणे होते ...